Kerala Floods : कॅप्टनने घराच्या छतावर उतरवले हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 12:28 PM2018-08-18T12:28:52+5:302018-08-18T12:29:47+5:30
अडकलेल्या 26 लोकांना वाचविले
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये आलेल्या महाप्रलयाने लाखो लोकांचा निवारा हिसकावला असून सर्वत्र पुराचे पाणी असल्याने नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. तिन्ही सैन्यदलांकडून बचावकार्य सुरु आहे. शुक्रवारी एका गर्द झाडांच्या ठिकाणी अडकलेल्या 26 लोकांना वाचविण्यासाठी कॅप्टनने हेलिकॉप्टर चक्क घराच्या छतावर उतरविले.
Yesterday Captain P Rajkumar Shaurya Chakra winched up 26 people from a SeaKing 42B helicopter, in extremely challenging conditions hovering between trees and in the limits of man and machine: Indian Navy #KeralaFloodspic.twitter.com/KeKKBnbF8n
— ANI (@ANI) August 18, 2018
कॅप्टन पी राजकुमार यांनी घरावर हेलिकॉप्टर उतरवत तेथे अडकलेल्या 26 जणांना वाचविले. या ऑपरेशनपर्यंत कुमार यांनी वाचविलेल्यांची संख्या 32 झाली होती. नौदलाने याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. हा भाग झाडांनी वेढलेला आहे. सध्याच्या पुरस्थितीत तेथे माणसाचे पोहोचणे कठीण होते. तसेच काही ठिकाणी दोरीव्दारे महिलांना एअरलिफ्ट केले गेले.