Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:19 AM2018-08-18T11:19:30+5:302018-08-18T11:19:36+5:30
Kerala Floods: केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत.
मुंबई - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सैन्याचे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळ वासियांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली आहे.
"केरळमधील प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्य असेल तर घरातच रहावे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा करतो. या परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या भारतीय जवानांचे आभार," असे विराटने ट्विट केले आहे.
Everyone in Kerala, please be safe and stay indoors as much as you can. Hope the situation recovers soon. Also, thanking the Indian army and NDRF for their incredible support in this critical condition. Stay strong and stay safe.
— Virat Kohli (@imVkohli) August 17, 2018
टेनिस स्टार सानिया मिर्झानेही, खेळाडू आणि संपूर्ण भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असा मॅसेज पाठवला आहे.
Prayers and thoughts with the people of Kerala 😞
— Sania Mirza (@MirzaSania) August 17, 2018
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील याने व्हिडीओच्या माध्यमातून केरळच्या जनतेसाठी मदतीचे आवाहन केले आहे.
Kerala needs one big assist, let's all do our bit. pic.twitter.com/wWDFoqLdP9
— Sunil Chhetri (@chetrisunil11) August 17, 2018
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, केरळा ब्लास्टर क्लबचा फुटबॉलपटू इयान ह्युम याच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळच्या लोकांसाठी मदतीची साद घातली आहे.
God’s own Country needs our help 🙏
— hardik pandya (@hardikpandya7) August 17, 2018
I request everyone to do their bit to help our brothers and sisters in #Kerala - https://t.co/UzevVKSfvipic.twitter.com/ZPi85imBG1
The people in Kerala need all the help possible, to deal with the crisis and get back on their feet. Here's some information on where and how you can help them out. #PrayForKerala#SOSKerala#KeralaFloodspic.twitter.com/nq6WHXzCml
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 17, 2018