केरळमध्ये संघाच्या चार कार्यकर्त्यांवर हल्ला, सीपीएमचा एक कार्यकर्ता अटकेत
By admin | Published: March 5, 2017 12:49 PM2017-03-05T12:49:08+5:302017-03-05T12:49:08+5:30
केरळमधील कोझिकोडे येथे डाव्यांचा पक्ष असलेला सीपीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील हिंसक संघर्ष सुरू असून
Next
ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 5 - केरळमधील कोझिकोडे येथे डाव्यांचा पक्ष असलेला सीपीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील हिंसक संघर्ष सुरू असून, शनिवारी संघाच्या तीन स्वयंसेवकांवर हल्ला झाल्यानंतर आता संघाचे चार स्वयंसेवक आणि भाजपाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, ज्या गटाने हल्ला केला ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होता आहे. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोरांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
डावे पक्ष आणि संघामधील राजकीय संघर्ष गेल्या काही दिवसांपासून हिंसक वळणावर पोहोचला असून, त्यातून दोन्हीकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. त्यातूनच गेल्या आठवड्यात संघाच्या कार्यालयाजवळ बॉम्बस्फोटही घडवण्यात आला होता.
#UPDATE 4 RSS workers and 1 BJP worker were attacked yesterday in Kozhikode, admitted to hospital #Kerala
— ANI (@ANI_news) March 5, 2017