लेकाला कडेवर घेऊन भाषण केल्याने महिला IAS अधिकाऱ्यावर टीका; पतीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:50 PM2022-11-05T15:50:49+5:302022-11-05T15:58:31+5:30

केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिव्या अय्यर यांनी एका खासगी चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह हजेरी लावली.

kerala ias officer divya iyer carries her child in arms during speech sparks debate | लेकाला कडेवर घेऊन भाषण केल्याने महिला IAS अधिकाऱ्यावर टीका; पतीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

लेकाला कडेवर घेऊन भाषण केल्याने महिला IAS अधिकाऱ्यावर टीका; पतीचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

googlenewsNext

एका महिला आयएएस अधिकाऱ्यावर सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या लहान लेकाला कडेवर घेऊन भाषण केल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. अनेक प्रश्नही विचारले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषण करणे उचित आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिव्या अय्यर यांनी एका खासगी चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषणही केले. मात्र त्यांची ही कृती अनेकांना आवडली नाही. यानंतर या घटनेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 

अदूरच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांपैकी एक तसेच राज्य विधानसभेचे उपसभापती चित्तायम गोपकुमार यांनी 30 ऑक्टोबरला आपल्या फेसबुक अकाउंटवर या कार्यक्राचे व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये दिव्या अय्यर आपल्या मुलाला कडेवर घेऊन भाषण करताना दिसत होत्या. यानंतर सोशल मीडियावर या घटनेसंबंधी चर्चांना उधाण आले. चित्तायम गोपकुमार यांनी वाद निर्माण झाल्यानंतर हे व्हिडीओ डिलीट केले. या व्हिडीओमध्ये दिव्या अय्यर आपल्या मुलाला घेऊन मंचावर बसल्या होत्या. यावेळी त्या मुलासह खेळताना आणि त्याला घेऊन भाषण करताना दिसल्या. 

"मुलांबरोबर वेळ घालवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला"

दिव्या अय्यर या एक उच्च पदस्थ अधिकारी असून असे वर्तन त्यांना शोभणारे नाही असं म्हणत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका करण्यात आली. असेही अनेक लोक आहेत जे दिव्या अय्यर यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यांनी म्हटलंय की महिला आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावत असतात आणि आपल्या मुलांबरोबर वेळ घालवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे. आपल्या पत्नीवर टीका झाल्यानंतर माजी आमदार आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, केएस सबरीनाधन पुढे आले आहेत. आपल्या पत्नीचा समर्थनार्थ ते म्हणाले, हा समारंभ पूर्णपणे अनौपचारिक होता. तसेच हा त्यांच्या सुट्टीचा दिवस असल्याने त्या आपल्या मुलाला समारंभाला घेऊन गेल्या.

"आठवड्याचे दिवस अधिकृत कामांसाठी पूर्णपणे समर्पित"

"दिव्या अय्यर या एक वचनबद्ध अधिकारी असून त्या त्यांच्या आठवड्याचे दिवस अधिकृत कामांसाठी पूर्णपणे समर्पित असतात. मात्र, सुट्टीच्या दिवशी प्रवास, बैठक आणि इतर कार्यक्रम टाळून त्या आपल्या मुलाबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. तथापि, काही कार्यक्रम टाळता येत नाहीत. अशा परिस्थितीत त्या आपल्या मुलासह संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची कल्पना आधीच आयोजकांना देऊन ठेवतात" असंही पतीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: kerala ias officer divya iyer carries her child in arms during speech sparks debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.