काेटींवरून लाखांवर आले मंत्र्यांचे उत्पन्न, साेने, हिऱ्यांसह महानगरात आहे भूखंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 06:43 AM2024-04-06T06:43:21+5:302024-04-06T06:44:08+5:30
Kerala Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते शशी थरुर आणि भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात तिरुवनंतपुरम मतदारसंघातत लढत हाेणार आहे. राजीव यांच्याकडे एकूण २८ काेटी रुपयांची संपत्ती आहे.
तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे नेते शशी थरुर आणि भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यात तिरुवनंतपुरम मतदारसंघातत लढत हाेणार आहे. राजीव यांच्याकडे एकूण २८ काेटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय त्यांची पत्नी अंजू यांच्याकडे १२ काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. राजीव यांच्या उत्पन्नात माेठी घट झाली असून त्यांच्या पत्नीचे उत्पन्न माेठ्या प्रमाणात वाढले आहे.
अशी वाढली संपत्ती
-१९.४१ काेटी रुपयांचे राजीव यांच्यावर कर्ज आहे.
-१.६३ काेटी रुपयांचे कर्ज त्यांच्या पत्नीवर आहे.
-१३.६९ काेटी रुपयांची एकूण जंगम मालमत्ता
-१२.४७ काेटी रुपयांची संपत्ती पत्नीकडे.
-१४.४० काेटी रुपये मूल्य असलेला बंगळुरू येथे भूखंड.
-१०.३८ काेटी रुपयांच्या विविध बँकांमध्ये ठेवी.
-६०.५५ लाख रुपयांच्या ठेवी पत्नीच्या विविध बँकांत आहेत.
-४१.२९ काेटी रुपयांचे कर्ज त्यांनी दिलेले आहे.
-३६९ ग्रॅम व हिरे असे मिळून ३.२५ काेटी रुपयांचे साेने व इतर मौल्यवान वस्तू आहेत.
-६,१०० ग्रॅम साेने राजीव यांच्या पत्नीकडे असून त्याची किंमत ३.५९ काेटी रुपये आहे.
उत्पन्न घटले
n५.५९ लाख रुपये उत्पन्न राजीव यांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षात हाेते.
n४.४८ काेटी एवढे उत्पन्न उत्पन्न २०१९-२० मध्ये हाेते.