केरळ राज्याचा अर्थसंकल्प लीक, विरोधकांचा आरोप
By admin | Published: March 3, 2017 05:23 PM2017-03-03T17:23:39+5:302017-03-03T17:27:30+5:30
केरळ राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियात लीक झाल्याचा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.
Next
ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 03 - केरळ राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियात लीक झाल्याचा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांनी शुक्रवारी सभागृहाचा त्याग केला.
वित्तमंत्री थॉमस इसाक यांनी सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनतर काही वेळानंतर विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी थॉमस इसाक यांना अर्थसंकल्प सादर करतेवेळी मध्येच थांबविले आणि म्हणाले की, अर्थसंकल्प आधीच सोशल मीडियात लीक झाला आहे. आता जो अर्थसंकल्प थॉमस इसाक सादर करत आहेत, तो आधीच सोशल मीडियात फेसबुकवर व्हायरल झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांनी गोंधळ घातला आणि सभागृहाचा त्याग केला.
दरम्यान, विधानसभेचे सभापती पी श्रीरामकृष्णन, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि वित्तमंत्री थॉमस इसाक यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या आरोपाची गंभीरपणे दखल घेत यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Kerala opposition boycott assembly proceedings as state FM Thomas Isaac presented the budget, allege that budget was leaked on social media
— ANI (@ANI_news) March 3, 2017