H1N1 Virus : सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:25 PM2023-06-23T14:25:41+5:302023-06-23T14:32:14+5:30

H1N1 Virus : लोकांना H1N1 व्हायरस संसर्गामुळे तापासह इतर लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

kerala teen dies of h1n1 virus know the symptoms of h1n1 | H1N1 Virus : सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

H1N1 Virus : सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

googlenewsNext

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कुट्टीपुरममध्ये काही दिवसांपूर्वी तापामुळे मृत्यू झालेल्या 13 वर्षांच्या मुलाला H1N1 व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुलगा कुट्टीपुरमजवळील पेनकन्नूर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर रेणुका यांनी गुरुवारी पुष्टी केली की मुलाचा मृत्यू H1N1 व्हायरसच्या संसर्गामुळे झाला आहे.

रेणुका यांनी लोकांना H1N1 व्हायरस संसर्गामुळे तापासह इतर लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, H1N1 व्यतिरिक्त डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या धोक्याबाबतही लोकांनी सतर्क राहायला हवं. रेणुका यांनी सांगितलं की, अलीकडेच मलप्पुरममध्ये डेंग्यूमुळे मृत्यूची दोन प्रकरणे समोर आली आहेत.

H1N1 व्हायरस म्हणजे काय?

स्वाइन फ्लूला H1H1 व्हायरस असंही म्हणतात. हा एक प्रकारचा इन्फ्लूएंझा व्हायरस आहे जो सामान्य खोकला आणि सर्दीपासून सुरू होतो. हेल्थलाइनच्या मते, हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. 2009 मध्ये लक्षणं सर्वप्रथम माणसांमध्ये दिसून आली. हा आजार जगभर पसरला आहे. WHO ने 2010 मध्ये H1H1 ला महामारी घोषित केलं. कोविड-19 प्रमाणे, त्याच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणं आवश्यक असू शकतं.

H1N1 व्हायरसची लक्षणं काय आहेत?

H1N1 व्हायरसची लक्षणं इतर फ्लू व्हायरससारखीच असतात.
- मधूनमधून ताप येणे. 
- स्नायू दुखणे
- थंडी वाजणे
- खोकला
- घसा खवखवणे
- सर्दी
- डोळे लाल होणे
- शरीर दुखणे
- डोकेदुखी
-  थकवा आणि अशक्तपणा

तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा जेणेकरून योग्य उपचार दिले जातील आणि वेळेत उपचार करता येतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: kerala teen dies of h1n1 virus know the symptoms of h1n1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.