"भाजपाने लुंगी आणि जाळीदार टोपीवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांची केली सुटका"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 03:31 PM2021-12-04T15:31:44+5:302021-12-04T15:39:19+5:30
Keshav Prasad Maurya And BJP : योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्येराजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी पुन्हा एकदा एक विधान केलं आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं आहे. योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असं म्हटलं आहे. तसेच भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.
प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला केशव प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले. "2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे."
#WATCH| Before 2017, how many lungi-clad goons used to roam here? Who in skull caps used to threaten the traders while carrying guns? Who used to encroach upon your land&threaten you to not go to Police? Remember all this:UP Dy CM KP Maurya at 'Vyapari sammelan' in Prayagraj pic.twitter.com/xsw7OBgziV
— ANI UP (@ANINewsUP) December 3, 2021
"2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल"
"व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019 पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत" असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकून 2022 मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.