'केसीर अने नेनू', चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 02:12 PM2018-12-13T14:12:56+5:302018-12-13T14:48:29+5:30
तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली.
हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर, चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणाचे सलग दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
तेलंगणाचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांनी राव यांना गोपनियतेची शपथ दिली. तर मोहम्मद अली यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. बुधवारी तेलगंणातील नवनिर्वाचि आमदारांनी केसीआर यांना आपला गटनेता म्हणून एकमताने निवडले होते. त्यानंतर, आज हा शपथविधी सोहळा पार पडला. केसीआर यांच्या टीआरएस पक्षाने राज्यातील 119 जागांपैकी तब्बल 88 जागा जिंकल्या आहेत.
केसीआर यांनी येत्या मार्चपर्यंत राज्यातील एक कोटी एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आश्वासन प्रचारात दिले. कालेश्वरम जलसिंचन प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी ठासून सांगितले होते. अन्न, वस्त्र, निवारा यासंबंधीच्या आश्वासनांना जनता भुलते हे राजकारण्यांना माहीत असते. जनतेसाठी दोन बीएचके आकाराच्या दीड लाख घरांचे सुरू असलेले बांधकाम, निवडणूक आचारसंहितेमुळे कंत्राटदारांना निधी न मिळाल्याने थांबले होते. त्यांनी 2024 पर्यंत राज्यात साडेपाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. ही घरे वेगाने पूर्ण करून त्यांचा ताबा लोकांना लवकरात लवकर द्यावा लागेल.
सुमारे अडीच कोटी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नळांची जोडणी, भागीरथी योजनेच्या अंतर्गत सर्वांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी अशी अनेक आश्वासने केसीआरना मुख्यमंत्रीपदाच्या दुसºया कारकीर्दीत पूर्ण करावी लागतील. तीच त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. टीआरएसला 46.38 टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण 34.04 टक्के होते.काँग्रेस, टीडीपी, सीपीआय, टीजीएस यांना मिळून गेल्या वेळी वेगळे लढूनही एकत्रितपणे 40.48 टक्के मते मिळाली होती. यंदा एकत्र लढूनही या पक्षांची मते 8 टक्क्यांनी घसरून 32.69 टक्क्यांवर आली. म्हणजेच तिथे जी महाआघाडी झाली होती, ती आपला प्रभाव पाडूच शकली नाही.
Hyderabad: K Chandrasekhar Rao takes oath as the Chief Minister of Telangana pic.twitter.com/BseNTRQqMF
— ANI (@ANI) December 13, 2018
Hyderabad: K Chandrasekhar Rao after taking oath as the Chief Minister of Telangana pic.twitter.com/KhsKuUVHU9
— ANI (@ANI) December 13, 2018