आयटीआय विद्यार्थ्यांसाठी साकडे रक्षा खडसे: भरतीत प्राधान्य द्या

By admin | Published: December 3, 2015 12:37 AM2015-12-03T00:37:12+5:302015-12-03T00:37:12+5:30

जळगाव : ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे सारख्या केंद्र सरकारच्या अस्थापनांमध्ये स्थानिक आयटीआय ॲप्रेंटीस करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली.

Khadee: For the ITI students, Sarada Defense Khadse: Prioritize | आयटीआय विद्यार्थ्यांसाठी साकडे रक्षा खडसे: भरतीत प्राधान्य द्या

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी साकडे रक्षा खडसे: भरतीत प्राधान्य द्या

Next
गाव : ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे सारख्या केंद्र सरकारच्या अस्थापनांमध्ये स्थानिक आयटीआय ॲप्रेंटीस करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत केली.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्याच आठवड्यात खडसे यांनी हा प्रश्न मांडला. ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे भरतीच्या नावाने देहरादून त्यानंतर भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत भरतीच्या नावाने काही समाज कंटकांनी घोटाळे करून बरोजगार आयटीआय विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी घेऊन उमेदवारांची यादी फॅक्टरी गेटवर लावण्यापर्यंत या समाजकंटकांची मजल गेली होती. अशा प्रकारातून असंख्य विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकारांना आळा बसावा यासाठी रेल्वे किंवा ऑर्डनन्स फॅक्टरी सारख्या अस्थापनांमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थी स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जावे. यातून घोटाळेबाज व्यक्तींना आळा बसून स्थानिक व्यक्तींचा फायदा होईल, अशी मागणी रक्षा खडसे यांनी कलम ३७७ अन्वये केली आहे.

Web Title: Khadee: For the ITI students, Sarada Defense Khadse: Prioritize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.