दिल्लीत खादीची धूम, एकाच दिवशी एक कोटीवर विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:16 AM2020-11-17T05:16:48+5:302020-11-17T05:16:58+5:30

सणासुदीच्या काळात उच्चांक

Khadi Dhoom in Delhi, selling for Rs 1 crore in a single day | दिल्लीत खादीची धूम, एकाच दिवशी एक कोटीवर विक्री

दिल्लीत खादीची धूम, एकाच दिवशी एक कोटीवर विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  दिवाळीसह सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत खादीची धूम सुरू आहे. कॅनॉट प्लेस येथील एका विक्री केंद्रातून १३ नोव्हेंबर रोजी ४० दिवसात चौथ्यांदा एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या खादीची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले.
खादीचा विक्रमी खप होण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदींनी स्वदेशीचा नारा देताना खादीच्या वापराला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. 
खादी आणि ग्रामोद्योगाचा कणा असलेल्या कारागिरांना मोठ्या संख्येने खादीप्रेमींकडून समर्थन मिळत आहे. कोरोनामुळे उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला असतानाही खादी उत्पादन पूर्ण जोमाने सुरू आहे. 
आर्थिक मंदी असतानाही केव्हीआयसीने खादीच्या विकासाची गती कायम राखण्यात यश मिळविले आहे. कॅनॉट प्लेस येथील विक्री केंद्रावरून गेल्या शुक्रवारी १ कोटी ११.४० लाखाची खादी विकल्या गेली, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.


विक्रमाकडे 
अशी झाली वाटचाल...
२     ऑक्टोबर..     
१.०२     कोटीची विक्री
२४     ऑक्टोबर...     
१.०५     कोटीची विक्री
७     नोव्हेंबर...     
१.०६     कोटीची विक्री
१३     नोव्हेंबर ...     
१.११     कोटी
 

Web Title: Khadi Dhoom in Delhi, selling for Rs 1 crore in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Khadiखादी