गडकरींना भेटून रिकाम्या हाताने परतले खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 06:34 AM2016-06-11T06:34:42+5:302016-06-11T06:34:42+5:30

खडसे गुरुवारी दिल्लीत पंतप्रधानांपासून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंतच्या नेत्यांपुढे आपली व्यथा मांडण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी डेरेदाखल झाले

Khadse meets Gadkari and returns empty handed | गडकरींना भेटून रिकाम्या हाताने परतले खडसे

गडकरींना भेटून रिकाम्या हाताने परतले खडसे

Next

प्रमोद गवळी,

नवी दिल्ली- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे गुरुवारी दिल्लीत पंतप्रधानांपासून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंतच्या नेत्यांपुढे आपली व्यथा मांडण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी डेरेदाखल झाले खरे, पण नितीन गडकरी यांच्याशिवाय त्यांना कोणाचीच भेट मिळू शकली नाही. शुक्रवारी ते हात हलवत मुंबईकडे निघाले. खडसे कोणत्या उद्देशाने आले होते, त्यांनी चुकीची वेळ निवडली काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
परदेश दौऱ्यावरून परतल्या परतल्या पंतप्रधान वेळ देणार नाहीत, हे माहीत असूनही त्यांनी प्रयत्न केले. अमित शहा दिल्लीतही नव्हते. खडसे बाजू मांडण्यासाठी येथे आले होते.
दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी खडसे यांनी आपण अलाहाबादेत पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे काहींना सांगितले. अलाहाबादेत भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. खडसे कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकतात; मात्र अखेरच्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नाही.

Web Title: Khadse meets Gadkari and returns empty handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.