खलिस्तानी, गँगस्टर्सची आता खैर नाही; १९ दहशतवाद्यांची यादी जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:12 AM2023-09-26T10:12:50+5:302023-09-26T10:13:36+5:30
एनआयए, रॉ, आयबी करणार खात्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दहशतवादी, खलिस्तानी आणि गँगस्टर यांची साखळी संपवण्यासाठी एनआयए, रॉ, आयबी आणि उत्तर भारतातील राज्यांतील एटीएस प्रमुखांची ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. कॅनडा, थायलंड, पाकिस्तान, सिंगापूर आणि ब्रिटनमधून भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी दहशतवादी, खलिस्तानी आणि गुंडांनी मोठे नेटवर्क तयार केले आहे.
१९ दहशतवाद्यांची यादी जारी
n अलीकडेच एनआयएने ४८ हून अधिक ठिकाणी छापे टाकले असून, त्यामुळे खलिस्तानी परदेशात पळून गेले आहेत. एनआयएने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, यूएई, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या १९ दहशतवाद्यांची यादी जारी केली होती.
n यात जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा भाचा लखबीरसिंग रोडे, जे. एस. धारीवाल, एस. हिम्मतसिंग, परमजीतसिंग पम्मा आणि अमरजीत पुरेवाल या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश आहे.
अनेक राज्ये त्रस्त
n दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआर प्रदेशात त्यांच्या कारवाया सुरू आहेत.
n दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने पंजाबी गायक मुसेवालाच्या हत्येपासून ते पंजाब आणि कॅनडापर्यंत अनेक हत्या केल्या आहेत. मुंबईत अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खलिस्तानी कारवाया,
n दहशतवादी कारवाया, टेरर फंडिंग आणि गुंडांच्या विरोधात संयुक्त कारवाई केली जाईल. या कारवाईची सूत्रे एनआयएकडे सोपवण्यात आली आहेत.