दिल्ली मेट्रो स्थानकावर खलिस्तानी संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:27 AM2023-08-28T05:27:38+5:302023-08-28T05:27:52+5:30
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिले होते.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या जी २० परिषदेपूर्वी किमान पाच दिल्ली मेट्रो स्थानकांवर खलिस्तान समर्थक संदेश लिहिलेले सापडले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिले होते. त्यात शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर आणि महाराजा सूरजमल स्टेडियम या स्थानकांचा समावेश आहे. नांगलोई येथील सरकारी शाळेच्या भिंतीवरही असेच लिखाण आढळून आले.
याबाबत कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोषींची ओळख पटवण्यासाठी पाचही मेट्रो स्थानकांच्या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.