Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:04 PM2023-03-29T20:04:01+5:302023-03-29T20:04:58+5:30

Who is Amitpal Singh: "खरे तर मला अटक करण्याचा सरकारचा हेतू नव्हता. मला अटकेची भीती वाटत नाही...."

Khalisthan supporter Amritpal Singh Absconding for 12 days releases new video amid police search | Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

googlenewsNext

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगने एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. 18 मार्चनंतर अमृतपाल पहिल्यांदाच समोर आला आहे. अमृतपालला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. अमृतपालने या नव्या व्हिडिओत म्हटले आहे, जर पोलिसांना मला अटक करायची असती तर त्यांनी मला घरून अटक केली असती. मला माळव्याला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. खरे तर मला अटक करण्याचा सरकारचा हेतू नव्हता. मला अटकेची भीती वाटत नाही. अमृतपाल सातत्याने पोलिसांना चकमा देत आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाला अमृतपाल - 
या व्हिडिओमध्ये अमृतपाल देश-विदेशातील शीख समुदायाच्या लोकांना एकत्रित येण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, मी शीख समाजाला आवाहन करतो की, त्यांनी बैसाखीच्या मुहुर्तावर सरबत खालसामध्ये सहभागी व्हावे आणि शीख समुदायाच्या छोट्या-मोठ्या समस्यांवर चर्चा करावी. कारण आपला समाज दीर्घ काळापासून छोट्य-छोट्या गोष्टींमध्येच अडकला आहे. आपण आपले प्रश्न सोडवायला हवेत. सरकारने आपमच्या सोबत धोका केला आहे. आमच्या सहकाऱ्यांना NSA वावून आसामला पाठविण्यात आले आहे. कारण ते शीख धर्मासंदर्भात बोलत होते.

अमृतपाल पुढे म्हणाला, माझ्या अनेक सहकाऱ्यांना आसामला पाठवण्यात आले आहे. तर काहींना तुरुंगात टाकण्यात आले आहे. हा अत्याचार आहे. आपण ज्या मार्गावर चालत आहोत त्या मार्गावर आपल्याला हे सर्व सहन करावे लागेल आणि हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. याच बरोबर, आपण देशात आणि परदेशात स्थाइक झालेल्या सर्व शीख बांधवांना आवाहन करतो की, बैसाखीच्या दिवशी होणाऱ्या सरबत खालसाकडे लक्ष असू द्या आणि आमच्या जत्थेदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिक कीर्तनांचे आयोजन करून आणि गावोगावी जाऊन लोकांना जागरुक करा.

एवढेच नाही, तर, माझे समाजाला आवाहन आहे की, जर आपल्याला पंजाबचे तरुण्य वाचवायचे असेल आणि आपले हक्क मिळवायचे असतील, तर आपण संघटित व्हायरला हवे. राहिले माझ्या अटकेचे, तर ते खऱ्या शासकाच्या हातात आहे. मी मजेत आहे. कुणी माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही.

Web Title: Khalisthan supporter Amritpal Singh Absconding for 12 days releases new video amid police search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.