चंबळचं खोरं : ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्यसैनिकांचं ‘जन्मस्थान’..
By Admin | Published: May 20, 2017 04:27 PM2017-05-20T16:27:17+5:302017-05-20T16:27:17+5:30
1857च्या स्वातंत्र्यसमराला 160 वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढय़ाचं एक जाज्वल्य स्मरण.
- समीर मराठे
‘डाकूंचं अभयारण्य’ म्हणून आजही कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरेतल्या चंबळच्या खोर्याची प्रतिमा तशी नकारात्मकच आहे, परंतु इतिहासात भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध मानल्या जाणार्या 1857च्या स्वातंत्र्यसमरात याच चंबळच्या खोर्यानं सर्वाधिक क्रांतिकारक या देशाला दिले आणि भारतभरात इंग्रजांनी क्रांतिकारकांची मुस्कटदाबी सुरू केली असताना याच चंबळच्या खोर्यातील क्रांतिकारकांनी इंग्रजांना कित्येक वर्षं सळो की पळो करुन त्यांच्या नाकात दम आणला होता हा इतिहास आहे. चंबळच्या याच खोर्यात 25 मे 1857ला शेकडो क्रांतिकारक एकत्र आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची तुतारी फुंकली होती. या घटनेला 25 मे रोजी बरोबर 160 वर्षे होतील. त्यानिमित्त त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आता एक वेगळी ‘जनसंसद’ बसणार आहे. चंबळच्या खोर्यातील समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे.