बहिणाबाई महोत्सवाचे २८ पासून आयोजन रक्षा खडसे : उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांचा होणार सन्मान
By admin | Published: February 7, 2016 10:45 PM2016-02-07T22:45:25+5:302016-02-07T22:45:25+5:30
(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
Next
(ग ्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)जळगाव : महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या कार्यकतृत्वाला वाव मिळावा यासाठी २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या दरम्यान सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी उकृष्ट कार्य करणार्या महिलांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.अजिंठा विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेस भाजयुमोचे दीपक फालक, बहिणाबाई महोत्सवाचे समन्वयक अमेय जोशी उपस्थित होते. महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, या महोत्सवात २५० महिला बचत गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १५० महिला बचत गटासाठी प्रवेश राखीव ठेवण्यात येणार आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने बेटी बचाव, बेटी पढाव तसेच शेतकरी आत्महत्या याबाबत संदेश देण्यात येणार आहे. पाच दिवस चालणार्या या महोत्सवाला ५० ते ६० हजार नागरिकांची उपस्थिती मिळले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.या महोत्सवाच्या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव यासाठी काम करणार्या मीरा उमप, चंदा तिवारी, निरंजन भागरे, लतिफ खैरा विविध कार्यक्रम सादर करणार आहेत. या दरम्यान महिला बचतगटांना माल विक्री, निर्मिती आणि जाहिरात याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवात २६ शाळा व ९ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी उत्कृष्ट काम करणार्या आठ महिलांना बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात मुंबई येथील उद्योजिका कल्पना सरोज, जालना येथील सिताबाई मोहिते, लक्ष्मी ॲग्रोच्या संध्या सूर्यवंशी, तुळजापूर येथील भारतबाई देवकर यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे.चौकटचित्राच्या रकमेची शेतकर्यांना मदतबहिणाबाई महोत्सवातंर्गत १४ फेब्रुवारी रोजी बहिणाबाई उद्यानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. बेटी बचाव, बेटी पढाव, आदर्श गाव, माझा खान्देश, पाणी वाचवा, बहिणाबाई या विषयांवर ही स्पर्धा होईल. या स्पर्धेत मुंबई, पुणे येथील नामांकित चित्रकार सहभागी होणार आहे. स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन बहिणाबाई महोत्सवात लावण्यात येणार आहे. या चित्रांच्या विक्रीतून आलेली रक्कम ही आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या वारसांना मदत स्वरुपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.