खान्देशातील साहित्य परंपरेला खंड पडू देणार नाही कुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन : बालसाहित्यिकांची ग्वाही
By Admin | Published: December 10, 2015 11:56 PM2015-12-10T23:56:38+5:302015-12-10T23:56:38+5:30
जळगाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली.
ज गाव : खान्देश भूमिला कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना.धो. महानोर यांची महान साहित्य परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला खंड पडू देणार नाही, अशी ग्वाही बालसाहित्यिक तथा खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ हिने दिली. विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुयोग कॉलनीतील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलन व कलामहोत्सवाला गुरुवारी, १० डिसेंबर रोजी सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ती बोलत होती. संमेलनाचे उद्घाटन अंश पिल्ले या बालसाहित्यिकाच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाले. या वेळी संमेलनाची अध्यक्षा कृष्णा वाघ, स्वागताध्यक्ष चिन्मय जगताप उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, कुतुहल फाउंडेश्नचे संचालक महेश गोरडे, परीक्षक डॉ. सुषमा खानापूरकर, आयुध निर्माणीचे निवृत्त कर्मचारी तथा साहित्य भूषण सन्मानित चंद्रकांत अंबाडे उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात अंश पिल्ले याने उद्घाटन झाल्याचे घोषित करुन ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरास्वागताध्यक्ष चिन्मय जगताप याने आपल्या भाषणात सांगितले की, हे संमेलन म्हणजे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांपैकी हे संमेलन म्हणजे शिवधनुष्यच आहे. कुमार साहित्यिकांच्या सुप्त गुणांना वाव देणाच्या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन म्हणावे लागेल. शाळा जीवन विषयक गुरुकुल असून येथील वातावरण पाहून गावाकडे आल्याचा भास होत असल्याचेही त्याने सांगितले. आपली शाळा हीच यशाचे शिखर असते, या शाळेमुळेच मी या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होऊ शकलो, असे प्रामाणिक मत चिन्मयने मांडले. मराठी जपणे आद्य कर्तव्यमराठी भाषेला मोठा इतिहास आहे, ती जपणे आपले आद्य कर्तव्य आहे. साहित्य संमेलन मराठीसाठी होतात, ही अभिमानाची बाब आहे, असे अध्यक्षा कृष्णा वाघ हिने सांगितले. तसेच ध्येय प्राप्त होण्यासाठी आत्मविश्वास असावा आणि त्याला प्रयत्नाचीही जोड असावी लागते. म्हणून स्वप्नपूर्ती करण्यासाठी कसून प्रयत्न केले पाहिजे. अपयशाने खचू नका, आपल्यातील वेगळेपण ओळखा, आयुष्य नटविण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. दररोज एकतरी पान वाचा, त्यामुळे मन सुंदर विश्वात रमेल, असा सल्ला वाघ हिने दिला.