खाप पंचायतीने 18 वर्षावरील मुलींच्या मोबाईल वापरावर घातली बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 05:25 PM2016-02-20T17:25:44+5:302016-02-20T20:08:34+5:30
मुली तसंच तरुणींविरोधात होणा-या गुन्ह्यांना मोबाईल जबाबदार असल्यामुळे अलिगड खाप पंचायतीने 18 वर्षावरील मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
उत्तर प्रदेश, दि. 20 - उत्तरप्रदेशातील अलिगड खाप पंचायतीने 18 वर्षावरील मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुली तसंच तरुणींविरोधात होणा-या गुन्ह्यांना मोबाईल जबाबदार असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचं पंचायतीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. बसौली गावातील ही घटना आहे.
नियमांचं कोणी उल्लंघन करु नये यासाठी पंचायतीने तीन वेगवेगळ्या समिती नेमल्या आहेत. जर कोणी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्या मुलीच्या कुटुंबाला गावातील रस्ते साफ करण्याची शिक्षा लगावण्यात येणार आहे. तसंच त्यांना दंडदेखील भरावा लागणार आहे.
अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचा हक्क पंचायतीला नसल्यांचं अतरिक्त जिल्हा दंडाधिकारी संजय चौहान यांनी सांगितलं आहे. तसंच संबंधित विभागाला यासंबंधी अहवाल देण्याची सुचना केली असल्याची माहितीदेखील संजय चौहान यांनी दिली आहे.