खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:17 AM2024-04-08T07:17:46+5:302024-04-08T07:19:07+5:30

‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही.

Kharge said, unemployment is the biggest issue; His mentality is that of 'Tukde Tukke Gang' - Modi | खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारी हा आहे, युवकांना नोकऱ्या शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे’, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये खरगे म्हणाले की, ‘१२ आयआयटीमध्ये, सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकरीची संधी (प्लेसमेंट) मिळत नाही. आतापर्यंत २१ आयआयएम फक्त २० टक्के प्लेसमेंट पूर्ण करू शकले. जर भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये ही परिस्थिती असेल, तर देशभरातील तरुणांचे भविष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याची कल्पना येऊ शकते, या सरकारच्या काळात तरुण बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘पहली नोकरी पक्की’ हमी आणली आहे. 


नवादा (बिहार) : “काँग्रेस अध्यक्ष खरगे विचारतात की, राजस्थानशी कलम ३७० हटवण्याचा काय संबंध? पण मी त्यांना सांगू इच्छितो की, राजस्थानमधील अनेक वीरांनी काश्मीरमध्ये रक्त सांडले आहे. असे असताना खरगे विचारतात की, काय संबंध? त्यांची मानसिकता ‘तुकडे तुकडे गँग’ची आहे,” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभेत  रविवारी केली. 

आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा बिहारमध्ये पोहोचले आणि नवादा येथील कुंतीनगरमध्ये एका महत्त्वाच्या निवडणूक सभेला संबोधित करताना म्हणाले की, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे छोटे पद नाही. कलम ३७० चा राजस्थानशी काय संबंध आहे असे ते म्हणतात. ही 
तुकडे तुकडे टोळीची मानसिकता आहे, असे माेदी म्हणाले. 

Web Title: Kharge said, unemployment is the biggest issue; His mentality is that of 'Tukde Tukke Gang' - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.