कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

By Admin | Published: April 14, 2016 12:54 AM2016-04-14T00:54:25+5:302016-04-14T00:54:25+5:30

जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.

Kharif planning for 11 thousand hectare increase in cotton cultivation: 21 lakh 68 thousand pots for cotton seed demand | कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

कपाशीच्या क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित खरिपाचे नियोजन : कपाशी बियाण्याच्या २१ लाख ६८ हजार पाकिटांची मागणी

googlenewsNext
गाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरने वाढ होईल. सर्वाधिक चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असा अंदाज असून त्या दृष्टीने हेक्टरी पाच कपाशीच्या बियाण्यांची गरज लक्षात घेता २१ लाख ६८ हजार ३३० कपाशी बियाण्याच्या पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे नोंदविली जाणार आहे.
खरीप २०१६-१७ संबंधीचे नियोजन राज्य शासन व जि.प.च्या कृषि विभागाने पूर्ण केले आहे. येत्या २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक कृषिमंत्री घेणार आहे. त्यातील सूचना लक्षात घेऊन आणखी नियोजनात बदल केला जाऊ शकतो.

सर्वाधिक कपाशी
जिल्‘ात खरिपाखाली सात लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र असते. कपाशीचे सरासरी क्षेत्र चार लाख ६५ हजार हेक्टर एवढे आहे. मागील हंगामात कपाशीची चार लाख २२ हजार ८६२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा त्यात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ होण्याची अपेक्षा असून, हे क्षेत्र चार लाख ३३ हजार ६६६ हेक्टर एवढे असेल, असा अंदाज आहे.

नॉन बीटीची फक्त एक लाखांवर पाकिटे
जिल्हाभरात बीटी कपाशीची सर्वाधिक लागवड होते. यामुळे नॉन बीटी म्हणजेच सुधारित संकरित कपाशीच्या बियाण्याची एक लाख ८ हजार १५ पाकिटांची मागणी केली जाणार आहे. तर सर्वाधिक २० लाख ६० हजार ७१२ बीटी कपाशीच्या बियाण्याच्या पाकिटांची मागणी केली आहे.

खरीप हंगाम आढावा घेणार
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि व महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे २३ रोजी दुपारी नियोजन भवनात खरीप आढावा बैठक घेणार आहे. त्यात हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, सूचना यासंबंधी चर्चा होईल. त्यानुसार आणखी नियोजन केले जाईल.

प्रमुख कंपन्यांकडे मागणी
कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असते. कापूस उत्पादकांना ऐनवेळी बियाण्यासंबंधी त्रास होऊ नये यासाठी बीटी कपाशी बियाणे निर्मात्या प्रमुख कंपन्यांकडे बियाण्याची जादा मागणी केली आहे. त्यांचा तुटवडा भासणार नाही यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.

Web Title: Kharif planning for 11 thousand hectare increase in cotton cultivation: 21 lakh 68 thousand pots for cotton seed demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.