हरयाणातील खट्टर सरकार अडचणीत; गृहमंत्र्यांचे बंड, खाते काढण्याच्या सूचनेमुळे संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:48 AM2021-12-31T07:48:58+5:302021-12-31T07:49:25+5:30

मुख्यमंत्र्यांनी गृह खाते काढून घेण्याची तयारी केल्याने हरयाणाचे ज्येष्ठ मंत्री अनिल विज संतापले असून, ते मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Khattar government in trouble in Haryana; Home Minister's revolt, anger over account withdrawal instructions | हरयाणातील खट्टर सरकार अडचणीत; गृहमंत्र्यांचे बंड, खाते काढण्याच्या सूचनेमुळे संताप

हरयाणातील खट्टर सरकार अडचणीत; गृहमंत्र्यांचे बंड, खाते काढण्याच्या सूचनेमुळे संताप

Next

चंदीगड : मुख्यमंत्र्यांनी गृह खाते काढून घेण्याची तयारी केल्याने हरयाणाचे ज्येष्ठ मंत्री अनिल विज संतापले असून, ते मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडील नगरविकास खाते काढून घेतल्यानंतर तुमच्याकडील गृह खाते आपण स्वत:कडे ठेवण्याच्या विचारात आहोत, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांना सांगितल्याने त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.

माझ्याकडून केवळ गृह खातेच का मागता? मी माझ्याकडील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व संशोधन. आयुष तसेच तंत्रशिक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञान ही खातेही सोडायला तयार आहोत, मला मंत्रिपदाची हौस नाही वा मंत्री असण्यात स्वारस्यही नाही. केवळ आमदार म्हणूनही मी काम करू शकतो, असे त्यांनी जाहीर करून टाकले.

माझ्याकडील गृह खाते काढून घेण्यासाठी दोन वर्षांपासून पद्धतशीर मोहीम सुरू आहे. त्यामुळे केवळ गृह खातेच का काढून घेता? माझ्याकडील सर्वच खाती, मंत्रिपद सोडायला मी तयार आहे.        -अनिल विज

Web Title: Khattar government in trouble in Haryana; Home Minister's revolt, anger over account withdrawal instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Haryanaहरयाणा