दीड वर्षांची असताना नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; 19 वर्षीय लेकीने आता केला नॅशनल रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 03:19 PM2022-06-11T15:19:42+5:302022-06-11T15:22:43+5:30

Supriti Kachchhap : खेलो इंडियाच्या शेवटच्या दिवशी सुप्रीतीने सुवर्णपदक जिंकले आहे. सुप्रीतीच्या या यशामागे तिच्या मेहनतीची आणि संघर्षाची गोष्ट आहे. 

khelo india programme jharkhand daughter supriti kachhap won gold medal | दीड वर्षांची असताना नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; 19 वर्षीय लेकीने आता केला नॅशनल रेकॉर्ड 

दीड वर्षांची असताना नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; 19 वर्षीय लेकीने आता केला नॅशनल रेकॉर्ड 

Next

झारखंडच्या कन्येने आपल्या राज्याची मान उंचावली आहे. गुमला जिल्ह्यातील घाघरा ब्लॉकच्या बुरुहू गावातील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय सुप्रीती कच्छपने (Supriti Kachchhap) अ‍ॅथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्डसह दमदार कामगिरी केली आहे. कोलंबिया येथे होणार्‍या अंडर-20 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ती पात्र ठरली आहे. गुरुवारी खेलो इंडियाच्या शेवटच्या दिवशी सुप्रीतीने सुवर्णपदक जिंकले आहे. सुप्रीतीच्या या यशामागे तिच्या मेहनतीची आणि संघर्षाची गोष्ट आहे. 

सुप्रीती दीड वर्षांची असताना आयुर्वेद डॉक्टर म्हणून गावकऱ्यांची सेवा करणाऱ्या सुप्रीतीच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुप्रीतीच्या आईने तिला प्राथमिक शिक्षणासाठी जानेरी ब्लॉकमधील बुकरुडीपा प्रभात मिशनरी स्कूलमध्ये दाखल केले. नंतर तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला. 2015 मध्ये गुमला जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेत, सुप्रीतीची मेहनत आणि क्षमता एका प्रशिक्षकाच्या लक्षात आली.  राज्य सरकारच्या अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक प्रभात रंजन तिवारी यांनी  मुख्याध्यापकांना मुलीला अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याची विनंती केली.

शाळेच्या मुख्याध्यापकांनीही होकार दिला आणि त्यातूनच सुप्रीतीचे प्रशिक्षण सुरू झाले. 2017 मध्ये विजयवाडा येथे झालेल्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुप्रीतीने दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर भोपाळ येथील साई केंद्राने सुप्रीतीला प्रशिक्षणासाठी भोपाळला पाठवण्याची विनंती केली होती. प्रशिक्षक प्रभात रंजन तिवारी, ज्यांनी सुप्रीतीला गुमला येथे सुरुवातीचे प्रशिक्षण दिले होते, त्यांनी तिला भोपाळमध्ये तिच्या वेळापत्रकानुसार प्रशिक्षण देण्याच्या अटीवर भोपाळला पाठवण्याचे मान्य केले. 

2020 मध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्व केंद्रे बंद होती, तेव्हा सुप्रीती गुमला येथे परतली. त्यानंतर गुमला येथील प्रशिक्षक प्रभात रंजन तिवारी यांनी सुप्रीतीच्या गुमला येथे राहण्याची आणि खाण्यापिण्याबरोबरच प्रशिक्षणाची आवश्यक व्यवस्था केली. मात्र, कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे असूनही भोपाळमध्ये पुन्हा प्रशिक्षण सुरू झाल्यावर सुप्रीतीने तेथे जाऊन प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. आता येत्या ऑगस्टमध्ये कोलंबियामध्ये होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही सुप्रीतीला मेडलची आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title: khelo india programme jharkhand daughter supriti kachhap won gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.