Khooni Nala Tunnel Collapsed: खुनी नाल्याने घात केला! जम्मू-श्रीनगर महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळला; सात कामगार अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:23 AM2022-05-20T09:23:36+5:302022-05-20T09:23:52+5:30
रामबन जिल्ह्यातील खुनी नाल्यावर हा प्रकार घडला आहे. बोगद्याच्या तोंडावरील कामाचे ऑडिट सुरु असताना हा अपघात झाला.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. चार लेनच्या बोगद्याचे काम सुरु असताना गुरुवारी रात्री या बोगद्याचा भाग कोसळला. यामुळे ९ लोक आतमध्ये अडकले होते. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
Jammu | Rescue operation underway at Khooni Nala, Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban, where a part of an under-construction tunnel collapsed late last night
— ANI (@ANI) May 20, 2022
J&K Disaster Management Authority says 10 labourers trapped under debris pic.twitter.com/8DsO24m2oo
रामबन जिल्ह्यातील खुनी नाल्यावर हा प्रकार घडला आहे. बोगद्याच्या तोंडावरील कामाचे ऑडिट सुरु असताना हा अपघात झाला. पोलिसांनी आणि भारतीय सैन्याने तातडीने रात्रीच्या अंधारातच मदतकार्य सुरु केले. या ढिगाऱ्याखाली ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी अडकले आहेत. सात लोक अद्याप आतमध्ये अडकले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बनिहालहून काही अॅम्बुलन्स घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत.
#WATCH | Rescue operation underway at Khooni Nala, Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban, where a part of an under-construction tunnel collapsed late last night; 6 to 7 feared trapped. pic.twitter.com/3LmZF0ctrm
— ANI (@ANI) May 20, 2022
रामबन जिल्ह्याचे उपायुक्तांनी सांगितले की, मेकरकोट भागात महामार्गाच्या खुनी नाल्यावर बोगद्याचे काम सुरु होते. त्याच्या एक भाग कोसळला आहे. सहा ते सात जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. मदतकार्य सुरु आहे.