काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहतीवरून खो-यात उद्रेक
By admin | Published: April 11, 2015 01:12 AM2015-04-11T01:12:12+5:302015-04-11T01:12:12+5:30
विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यात स्वतंत्र वसाहत उभारण्यास विरोध करणारे फुटीरवादी व राजकीय पक्षांविरुद्ध अनेक संघटना
जम्मू/श्रीनगर : विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यात स्वतंत्र वसाहत उभारण्यास विरोध करणारे फुटीरवादी व राजकीय पक्षांविरुद्ध अनेक संघटना शुक्रवारी जम्मूत रस्त्यावर उतरल्या. काश्मिरी पंडितांसाठी खोऱ्यात स्वतंत्र वसाहत उभारण्याची एकमुखी मागणी या संघटनांनी केली. दरम्यान, स्वतंत्र वसाहतीस विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये हिंसक निदर्शने झाली.
विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत उभारण्याच्या मागणीला विरोध चालवला आहे. राज्यातील आघाडी सरकारमधील पीडीपी व भाजपा या दोन्ही पक्षांनीही या मुद्यावर परस्परविरोधी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या.
काश्मीर खोऱ्यातून विस्थापित होऊन २५ वर्षे उलटली. आता आम्हाला स्वगृही परतायचे आहे. पण मूळ ठिकाणी परतण्यास सध्या स्थिती अनुकूल नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात आमच्यासाठी स्वतंत्र वसाहत स्थापन व्हावी जेणेकरून आम्ही याठिकाणी शांतीने राहू शकू, असे काकाजी भट्ट या काश्मिरी पंडिताने सांगितले. (वृत्तसंस्था)