खुदीराम बोस स्मृतिदिन

By Admin | Published: August 11, 2016 03:30 PM2016-08-11T15:30:59+5:302016-08-11T15:31:36+5:30

भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणा-या खुदीराम बोस यांचा आज (११ ऑगस्ट) स्मृतीदिन

Khudiram Bose Memorial Day | खुदीराम बोस स्मृतिदिन

खुदीराम बोस स्मृतिदिन

googlenewsNext
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ११ -  भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले.
 
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याययांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.
 
यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बाँब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
 
घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडला गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतिकारक ठरला.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Khudiram Bose Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.