तलाकच्या खटल्यात खुर्शीद न्यायालयाचे मित्र
By admin | Published: May 4, 2017 01:24 AM2017-05-04T01:24:34+5:302017-05-04T01:24:59+5:30
तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलेल्या याचिकांवरील
नवी दिल्ली : तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलेल्या याचिकांवरील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाला साह्य करण्यास माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांना न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली.
सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद यांना ‘न्यायालयाचे मित्र’ (अॅमिकस क्युरी) म्हणून काम करण्यास परवानगी दिली व त्यांना या प्रकरणात त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगितले. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एस. के. कौल यांचा खंडपीठात समावेश आहे. खुर्शीद म्हणाले की, लेखी म्हणणे सादर करण्याची वेळ संपून गेली आहे व मला या प्रकरणात काही म्हणणे मांडायचे आहे. यावर खंडपीठाने काही अडचण नाही, आम्ही ते नोंदवून घेऊ, असे म्हटले.
तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलेल्या याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ११ मेपासून सुनावणीला प्रारंभ होईल.