खाविआ, मनसेतर्फे शक्तीप्रदर्शन महापौर निवडणूक : नितीन ल‹ा, ललित कोल्हे यांचे अर्ज दाखल; भाजपातर्फेही अर्ज दाखल

By admin | Published: March 4, 2016 10:36 PM2016-03-04T22:36:32+5:302016-03-04T22:36:32+5:30

जळगाव: महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खाविआ व मनसेतर्फे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नगरसेवक, समर्थकांना उपस्थित ठेवत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन ल‹ा तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपातर्फे माजी स्थायी समिती सभापती ज्योती बाळासाहेब चव्हाण यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी विजय गेही यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Khwiya, MNS voted for Mayor election: Nitin Laxman, Lalit Kollhe filed nomination; The application filed by BJP also | खाविआ, मनसेतर्फे शक्तीप्रदर्शन महापौर निवडणूक : नितीन ल‹ा, ललित कोल्हे यांचे अर्ज दाखल; भाजपातर्फेही अर्ज दाखल

खाविआ, मनसेतर्फे शक्तीप्रदर्शन महापौर निवडणूक : नितीन ल‹ा, ललित कोल्हे यांचे अर्ज दाखल; भाजपातर्फेही अर्ज दाखल

Next
गाव: महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खाविआ व मनसेतर्फे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नगरसेवक, समर्थकांना उपस्थित ठेवत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन ल‹ा तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपातर्फे माजी स्थायी समिती सभापती ज्योती बाळासाहेब चव्हाण यांनी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी विजय गेही यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खाविआ, मनसे, जनक्रांती, शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ४७ झाले आहे. तर बहुमतासाठी केवळ ३८ संख्याबळाची आवश्यकता आहे. तर भाजपानेही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून उमेदवार दिले आहेत. खाविआचे उमेदवार नितीन ल‹ा व मनसेचे उमेदवार ललित कोल्हे हे शुक्रवारी दुपारी १२-४५च्या मुहूर्तावर अर्ज भरणार होते. त्यासाठी खाविआ, मनसे, जनक्रांतीचे सर्व नगरसेवक, महिला नगरसेविकांचे पती, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात नगरसचिवांनी उपस्थित राहून उमेदवारी अर्ज स्विकारले. यावेळी खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी सर्व नगरसेवक तसेच नगरसेविका पतींना व्यासपीठावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या सर्वांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे खाविआने पूर्ण बहुमत आपल्यासोबत असल्याचे संकेत यातून दिल्याचे दिसून आले.
दोघांचे डमी अर्ज
महापौरपदासाठी नितीन ल‹ा यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातील पहिल्या अर्जासाठी सूचक राखी सोनवणे, अनुमोदक सुनील महाजन, दुसर्‍या अर्जावर सूचक रमेशदादा जैन तर अनुमोदक विष्णू भंगाळे आहेत. तर महापौरपदासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वर्षा खडके यांचा डमी अर्जही दाखल करण्यात आला आहे. त्यावर सूचक म्हणून ममता संजय कोल्हे, अनुमोदक सविता शिरसाठ यांच्या स‘ा आहेत. उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यात पहिल्या अर्जावर सूचक संतोष पाटील तर अनुमोदक म्हणून गणेश बुधो सोनवणे, दुसर्‍या अर्जावर सूचक लिना पवार, अनुमोदक नितीन बरडे यांच्या स‘ा आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून विजय कोल्हे यांचा डमी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर सूचक म्हणून खुशबू बनसोडे, तर अनुमोदक म्हणून चेतन शिरसाळे यांच्या स‘ा आहेत.

Web Title: Khwiya, MNS voted for Mayor election: Nitin Laxman, Lalit Kollhe filed nomination; The application filed by BJP also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.