चित्रपट पाहून केलं अपहरण आणि हत्या

By admin | Published: March 21, 2016 09:26 AM2016-03-21T09:26:53+5:302016-03-21T09:26:53+5:30

15 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करुन हत्या करणा-या आरोपींनी चित्रपट पाहून ही कल्पना सुचल्याची धक्कादायक कबुली दिली आहे

Kidnapping and murder of the movie | चित्रपट पाहून केलं अपहरण आणि हत्या

चित्रपट पाहून केलं अपहरण आणि हत्या

Next
>ऑनलाइन लोकमत - 
हैद्राबाद, दि. २१ - 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करुन हत्या करणा-या आरोपींनी चित्रपट पाहून ही कल्पना सुचल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. दहावीत शिकणा-या अभय मोदानीचं गेल्या आठवड्यात अपहरण झालं होतं. बुधवारी त्याचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी मृतदेहाला दोरीच्या सहाय्याने बांधून एका बॉक्समध्ये टाकला होता. 
 
पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबात टॉलिवूड चित्रपट पाहून हे अपहरण करण्याची कल्पना सुचल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी साईने आपल्या 2 मित्रांसोबत अभयचं अपहरण करुन खंडणी मागण्याचा हा कट रचला होता. साईला फिल्मस्टार बनायचे होते, त्यासाठी त्याला पैसे हवे होते म्हणून हा कट रचला होता अशी माहिती पोलीस आयुक्त महेंद्र रेड्डी यांनी दिली आहे. 
 
साईने अभयच्या घराशेजारी काम केलं असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. अभय नवनवीन गॅझेट्स वापरायचा त्यामुळे तो श्रीमंत घरातील असेल असं साईला वाटलं होतं. 16 मार्चला अभयने साईला लिफ्ट दिली होती त्यावेळीच त्याचं अपहरण करण्यात आलं. अभयने दंगा करु नये यासाठी त्याच्या तोंडाला पट्टी बांधण्यात आली ज्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी खंडणी मागण्यासाठी नवीन सीमकार्डदेखील विकत घेतले. 
अभयचा मृत्यू झाला असतानादेखील आरोपींनी त्याच्या वडिलांकडे 10 कोटींची खंडणी मागितली. अभयचे वडील राजकुमार यांनी इतकी रक्कम देणं शक्य नसल्यांचं सांगितल्यावर आरोपी 5 कोटींवर तयार झाले. आरोपींनी रेफ्रिजरेटरच्या बॉक्समध्ये अभयचा मृतदेह टाकून सिकंदराबाद रेल्वे स्टेशनजवळ ठेवून दिला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केला असता हैद्राबाद आणि सिकंदराबादमधील अनेक सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाल्याचं दिसलं. सीसीटीव्ही तपासात त्यांनीच अभयचा मृतदेह एका हॉटेलबाहेर टाकल्याचं निष्पन्न झालं आहे. 
 

Web Title: Kidnapping and murder of the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.