Karnataka Sex CD Scandal : आक्षेपार्ह सीडी प्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचं झालं अपहरण, पालकांनी केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:28 AM2021-03-18T08:28:27+5:302021-03-18T08:37:04+5:30
Karnataka Sex CD Scandal And Ramesh Jarkiholi : भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून (Karnataka Sex CD Scandal) मोठी खळबळ उडाली. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्याभाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. मात्र आता भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.
आक्षेपार्ह सीडी प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडितेच्या आई वडिलांनी आता केला आहे. पीडित महिलेच्या आई-वडिलांनी बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपला जीव धोक्यात असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी बेपत्ता महिलेच्या पालकांनी बेळगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपल्या जीवालाही धोका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 मार्च रोजी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.
2 मार्च याच दिवशी संबंधित आक्षेपार्ह सीडी उघडकीस आली होती. याच दिवशी आपण आपल्या मुलीशी शेवटचं बोललो असा दावाही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पीडितेच्या वडिलांनी 'संबंधित व्हिडीओमध्ये दिसणारी महिला माझी मुलगी नाही. कोणीतरी आपल्या मुलीसारख्या दिसणाऱ्या महिलेचा वापर केला आहे. याबाबतचा खुलासा स्वतः पीडित मुलीने आपल्या आईकडे केला असल्याचंही वडिलांनी सांगितलं आहे. याबाबत पालकांनी दोन मिनिटांचा व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी जारकीहोळी यांचं वादग्रस्त संभाषण लीक झालं होतं. रमेश जारकीहोळी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (Yeddyurappa) यांच्यावर गंभीर आरोप केला. येडियुरप्पा यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळी यांनी म्हटलं. तसेच मराठी लोक चांगले आहेत आणि ... कानडींना काही काम नाही असं देखील जारकीहोळी यांनी म्हटलं. हे संभाषण जोरदार व्हायरल झालं. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांवर जोरदार टीका केली. हे केवळ सेक्स स्कँडल नाही. त्या टेपमध्ये मंत्र्यांनीच मुख्यमंत्री येडियुरप्पा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल असं म्हटलं.
मोठमोठ्या नेत्यांसोबत ओळख असल्याचं सांगून देत होता धमकीhttps://t.co/WhKDTUr2c5#BJP#crime#crimesnews#Police
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021
नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.
"तुम्ही आणि तुमच्या घरचे मला जगू देत नाहीत", खासदाराच्या घराबाहेरचं कापून घेतली हाताची नसhttps://t.co/Rr5An2du1y#crime#CrimeNews#Suicide#BJPpic.twitter.com/38wd2yZlHC
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021