किडनी रॅकेट उघड! मोठ्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरचा सहभाग; सहकाऱ्याच्या खात्यावर सापडले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 02:03 PM2024-07-09T14:03:31+5:302024-07-09T14:06:47+5:30

दिल्ली पोलिसांनी एक आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आणले आहे, या रॅकेटमध्ये दिल्लीतील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे.

Kidney racket exposed participation of women doctors in large hospitals Lakhs of rupees found in colleague's account | किडनी रॅकेट उघड! मोठ्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरचा सहभाग; सहकाऱ्याच्या खात्यावर सापडले लाखो रुपये

किडनी रॅकेट उघड! मोठ्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरचा सहभाग; सहकाऱ्याच्या खात्यावर सापडले लाखो रुपये

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आले आहे. एका मोठ्या हॉस्पिटलमधील एक महिला डॉक्टरचा या रॅकेटमध्ये समावेश आहे. या डॉक्टरसह ७ जणांना या प्रकरणी अकट करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी दिल्ली क्राइम ब्रॅचने दिल्ली राजस्थानसह बांगलादेशपर्यंतचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Hathras Stampede : "माझ्या पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण भोले बाबांनी..."; पतीचा मोठा दावा, सांगितला चमत्कार

डॉक्टरच्या सहाय्यकाजवळ सापडले लाखो रुपये 

या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील एका मोठ्या हॉस्पिटलमधील ५० वर्षीय महिला डॉक्टरला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरने १५ ते १६ ऑपरेशन केले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध मानवी किडनीचा हा अवैध व्यवसाय बांगलादेशातून चालवला जात होता पण ऑपरेशन्स भारतात होत होते. या महिला डॉक्टरने यापूर्वी १५-१६ किडनी काढल्या आहेत.

बांगलादेशच्या या रॅकेटप्रकरणी राजस्थान पोलिसांनी मोठा खुलासा केला होता. यानंतर दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँचही या प्रकरणाचा तपास करत आहे. दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरने नोएडा येथील रुग्णालयात १५ ते १६ प्रत्यारोपण केले आहेत. या अवैध धंद्याचे पैसे या महिला डॉक्टरच्या खासगी सहाय्यकाच्या खात्यात यायचे आणि महिला डॉक्टर ते रोखीने काढायचे, असा आरोप करण्यात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट बांगलादेशातून चालवले जात होते. 

यासाठी बांगलादेशातील रॅकेटमधील लोक डायलिसिस सेंटरमध्ये जाऊन कोणत्या रुग्णाला किडनीची गरज आहे आणि त्याची क्षमता किती आहे हे पाहायचे. एखादा रुग्ण २५ ते ३० लाख रुपये द्यायला तयार झाला की त्याला भारतीय वैद्यकीय संस्थेमार्फत उपचारासाठी भारतात पाठवायचे.

नोकरीच्या नावाखाली बांगलादेशातून यायचे

नोकरीच्या नावाखाली बांगलादेशातून लोकांना आणले जायचे, त्यानंतर या रॅकेटचे लोक काही गरीब बांगलादेशींना पकडून पैशाचे आमिष दाखवून किडनी दान करायला तयार करायचे. यानंतर ते त्याला फसवून भारतात आणायचे आणि किडनीची गरज असलेल्या रुग्णाला आपले नातेवाईक म्हणायचे. त्यानंतर त्या व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याची किडनी काढायची. या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ४ दिवसांपूर्वी दिल्लीतूनच अटक केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाने महिला डॉक्टरला निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही देणगीदारांनी त्यांना नोकरीच्या नावाखाली भारतात आणले आणि नंतर त्यांची किडनी येथे काढण्यात आल्याचेही सांगितले.

Web Title: Kidney racket exposed participation of women doctors in large hospitals Lakhs of rupees found in colleague's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.