बापरे! चिमुकल्याच्या चेहऱ्याच्या चिंधड्या केल्या, पडले १०० टाके; डॉक्टर म्हणाले- अशी केस पाहिली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:41 PM2022-03-08T21:41:46+5:302022-03-08T21:42:09+5:30
Dog attacked on 5 year old child : रुग्णालयात पोहोचलेल्या डॉक्टरांनी तब्बल दीड तास शस्त्रक्रिया केली. या ऑपरेशनमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर 100 हून अधिक टाके पडले आहेत.
राजस्थानमधील भिलवाडा येथे घराबाहेर खेळणारा पाच वर्षांचा निष्पाप चिमुकल्याला श्वानाने अक्षरश: उरबडून काढले आहे. श्वानाने 20 ते 25 सेकंदांपर्यंत मुलाचे लचके तोडले. मुलाचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या कुटुंबीयांनी त्याला कसेतरी वाचवले, मात्र तोपर्यंत श्वान मुलाच्या नाकाच्या हाडापर्यंत चावला होता. रुग्णालयात पोहोचलेल्या डॉक्टरांनी तब्बल दीड तास शस्त्रक्रिया केली. या ऑपरेशनमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर 100 हून अधिक टाके पडले आहेत.
श्वानाने मुलाला इतके चावले होते की त्याच्या चेहऱ्याचा आणि डोक्याचा काही भाग त्वचेखाली गेला होता. त्यामुळे डॉक्टरांनाही त्याचे डोळे, नाक आणि ओठ यांना टाके घालावे लागले आहेत. उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी आयुष्यात असा प्रसंग पाहिला नव्हता. डॉक्टरांनी बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील मंडल येथील काळुखेडा गावात राहणारा चिमुकला सोमवारी सायंकाळी उशिरा मुलांसोबत घराबाहेर खेळत होता. यादरम्यान श्वानाने त्यांच्यावर हल्ला केला आणि तोंडाला चावा घेतला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या कुटुंबीयांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून त्याला वाचवले, त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना भिलवाडा येथे रेफर केले. खासगी रुग्णालयाचे ईएनटी तज्ज्ञ डॉ.राजेश जैन यांनी सुमारे दीड तास त्याच्यावर शस्त्रक्रिया केली.
डॉक्टर म्हणाले - अशी केस यापूर्वी पाहिली नाही
ईएनटी तज्ज्ञ डॉ. राजेश जैन यांनी सांगितले की, बालक गंभीर जखमी आहे. असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात याआधी पाहिला नव्हता. श्वानाने मुलाच्या चेहऱ्याला चावा घेतला होता. यामुळे त्याचा चेहरा खराब झाला होता. रुग्णालयात येताच त्यांचे ऑपरेशन सुरू करण्यात आले, जे सुमारे दीड तास चालले.
मुलाच्या नाकाची संपूर्ण त्वचा निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्वचा परत बसवणं खूप कठीण होतं. डोक्याची पुढची कातडी फिरवून कपाळावर घेतली आणि नाकाची पुढची कातडी पूर्णपणे दुरुस्त झाली. सुमारे 100 टाके लागले.