नरभक्षक वाघाला ठार मारा, वनविभागाचे आदेश; परिसरात प्रचंड दहशत, लोकांचा रोष पराकोटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 05:49 AM2022-10-08T05:49:07+5:302022-10-08T05:49:40+5:30
वाघाचा धुमाकूळ थांबत नसल्याने वनविभागाने अखेर त्याला ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा: बिहारच्या वाल्मीकी व्याघ्र प्रकल्पातील नरभक्षक वाघाने गुरुवारी रात्री १२ वर्षीय बालिकेला ठार केल्यानंतर काही तासातच आणखी एकाचा बळी घेतला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरण्यासह लोकांचा रोष पराकोटीला पोहोचला आहे. वाघाचा धुमाकूळ थांबत नसल्याने वनविभागाने अखेर त्याला ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत.
गोबर्धना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरी गावचे रहिवासी संजय महातो (३५) शुक्रवारी सकाळी शौचासाठी शेताकडे गेले होते. तेव्हा वाघाने त्यांच्यावर झडप घातली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेच्या काही तास आधी गुरुवारी रात्री या वाघाने सिंघाही गावातील एका १२ वर्षीय मुलीला घरातून उचलून नेऊन ठार केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"