आम्हाला ठार मारा पण पुन्हा माघारी पाठवू नका- रोहिंग्यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 01:13 PM2017-08-19T13:13:27+5:302017-08-19T17:27:42+5:30

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयावर मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी टीका केली. आता रोहिंग्याही आम्हाला परत पाठवू नका अशी विनंती करत आहेत.

Kill us but don't send back- Rohingya Muslims | आम्हाला ठार मारा पण पुन्हा माघारी पाठवू नका- रोहिंग्यांची विनंती

आम्हाला ठार मारा पण पुन्हा माघारी पाठवू नका- रोहिंग्यांची विनंती

Next
ठळक मुद्देहैदराबादमध्ये रोहिंग्या लहानशा झोपड्यांमध्ये किंवा लहानशा एका खोलीच्या भाड्याच्या घरांमध्ये राहात आहेत. शहराच्या बालापूर, शाहिन नगर, जालपल्ली, असादबाबा नगर, पहाडी शरिफ अशा दक्षिणेकडिल उपनगरांमध्ये ते स्थायिक झाले आहेत.

हैदराबाद, दि,19 - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये भारतात आलेल्या रोहिंग्यांबद्दल माहिती दिली. भारतामध्ये सर्वाधीक रोहिंग्यांची संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये असल्याचे सांगत रिजिजू यांनी या रोहिंग्यांना पुन्हा मायदेशी म्हणजे म्यानमारला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयावर मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी टीका केली. आता रोहिंग्याही आम्हाला परत पाठवू नका अशी विनंती करत आहेत. एकवेळ आम्हाला इथेच ठार मारा पण मायदेशी म्हणजे म्यानमारला हाकलू नका अशी आर्त विनंती हैदराबादच्या रोहिंग्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.
हैदराबादमध्ये 3800 रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. आता या शहरात पाच वर्षे राहिल्यानंतर पुन्हा म्यानमारला मृत्यूच्या खाईत आम्हाला ढकलू नका आणि रोहिंग्यांना मायदेशी पाठवण्याच्या कल्पनेचा परत एकदा मानवाधिकाराच्या दृष्टीने विचार करा असे साकडे हे लोक भारत सरकारला घालत आहेत.

बंगालच्या उपसागरातील तरंगत्या शवपेट्या

स्थलांतरितांनी हंगेरी सोडले
हैदराबादमधील रोहिंग्या समुदायाचा एक सदस्य अब्दुल रहिम याने आपल्या भावना व्यक्त करताना वृत्तसंस्थेला सांगितले, ''भारताने आम्हाला आश्रय दिला याबद्दल धन्यवाद. सरकारने आम्हाला परत पाठवायला ठरवलंच तर ते पाठवू शकतात, पण परत पाठवण्यापेक्षा आम्हाला ठार मारलं तर बरं होईल " 32 वर्षांचा रहिम तीन मुले आणि पत्नीसोबत हैदराबादमध्ये 2012 पासून वास्तव्यास आहे. जर आमचा जीव आणि संपत्ती सुरक्षित राहणार असल्याची खात्री झाली तरच म्यानमारला जाऊ असं त्याचं मत आहे. रहिम म्यानमारच्या रखाइन प्रांतामध्ये शेती करत असे. म्यानमार सरकारने त्याची शेती ताब्यात घेतल्यावर त्याला जीव वाचविण्यासाठी म्यानमार सोडावाच लागला. त्याचे दोन भाऊ बांगलादेशात गेले तर रहिमने भारतात स्थलांतर करणे पसंत केले. सध्या तो इतर रोहिंग्याप्रमाणे रोजंदारीवर काम करतो. दिवसभर काम केल्यावर त्याला 500 रुपये रोजगार मिळतो तर महिन्यातील केवळ 15 दिवसच त्याला काम मिळते.

63 वर्षांचा दुसरा रोहिंग्या आश्रित महंमद युनुस यानेही अशीच मते मांडली. एका आयुष्यात आपल्याला तीनवेळा आश्रिताचं जीवन जगावं लागलं अशा शब्दांमध्ये त्यांने दुःख व्यक्त केलं. ते (म्यानमार सरकार, लष्कर) कधीच आपला शब्द पाळत नाहीत असंही युनुसने सांगितलं. युनुस आपली पत्नी आणि मुलीसोबत हैदराबादमध्ये राहात आहे. म्यानमारच्या लष्कराने झाडलेली गोळीमुळे झालेल्या जखमेची खुण आजही त्याच्या खांद्यावर आहे. या जखमेवर योग्य उपचार न झाल्यामुळे युनुसला बांगलादेशात जाऊन उपचार घ्यावे लागले होते. युनुस म्यानमारच्या अराकान प्रांतामध्ये व्यवसाय करत असे. त्याची सगळी संपत्ती म्यानमार सरकारने जप्त केली. भारतात पहिले काही महिने  जम्मू आणि काश्मीर राज्यानंतर हैदराबादमध्ये सर्वात जास्त संख्येने रोहिंग्या राहात आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये 7000 रोहिंग्या राहात आहेत. हैदराबादमध्ये हे लोक लहानशा झोपड्यांमध्ये किंवा लहानशा एका खोलीच्या भाड्याच्या घरांमध्ये राहात आहेत. शहराच्या बालापूर, शाहिन नगर, जालपल्ली, असादबाबा नगर, पहाडी शरिफ अशा दक्षिणेकडिल उपनगरांमध्ये ते स्थायिक झाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या रेफ्युजी हायकमिशनरच्या (यूएनएचसीआर) मते भारतात 16 हजार रोहिंग्या राहात आहेत. मात्र  वास्तवात त्यांची संख्या 40 हजार इतकी आहे.

 

Web Title: Kill us but don't send back- Rohingya Muslims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत