रंजन हत्या; दोघे स्थानबद्ध
By admin | Published: May 16, 2016 04:32 AM2016-05-16T04:32:00+5:302016-05-16T04:32:00+5:30
पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येचा सीबीआय तपास करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे
सिवान : पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येचा सीबीआय तपास करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. हत्या कुणी केली हे सर्वच जाणतात, पण कुणी बोलायला तयार नाही, असे रंजन यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
रंजन यांच्या हत्येच्या संदर्भात पोलिसांनी रविवारी दोन जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, हल्लेखोरांना पकडून कठोर शासन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे. रंजन हे हिंदुस्तान या
हिंदी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार होते. सिवान रेल्वे स्थानकावर मोटारसायकलने आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.
बिहारमध्ये जे काही
घडले आहे ते अत्यंत दु:खद आहे.
या प्रकरणी जे कुणी दोषी
असतील त्यांना पकडून शिक्षा
केली जाईल, असे बिहारचे
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी
लखनौ येथे पत्रकारांना सांगितले. (वृत्तसंस्था)