चेन्नईतील पूरग्रस्तांना 'किंग खान'ची मदत
By admin | Published: December 7, 2015 08:31 PM2015-12-07T20:31:48+5:302015-12-07T20:31:48+5:30
न्नईमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मंडळीनी धाव घेतली असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने सुद्धा पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - चेन्नईमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मंडळीनी धाव घेतली असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने सुद्धा पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
रेड चिली या कंपनीसोबतच आगामी चित्रपट 'दिलवाले'च्या टीमतर्फे शाहरुख खानने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री साहायत्ता निधीत एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. शाहरुखसह अनेक कलाकारांसह खेऴाडूनीही मदत जाहीर केली आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, राणा दग्गुबती, सायना नेहवाल, मुथय्या मुरलीधरन, दीपिका पिल्लीकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहायत्ता निधीत २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तामीळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक ठिकाणी आलेल्या विनाशकारी पुरामुऴे अनेक जण बेघर झाले, तर २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.