किंगफिशर व्हिलाचा लिलाव अपयशी

By admin | Published: December 23, 2016 01:54 AM2016-12-23T01:54:41+5:302016-12-23T01:54:41+5:30

बँकांचे कोट्यवधींचे कर्ज विदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांचा गोव्यातील बंगला ‘किंगफिशर विला’ विकून पैसे वसूल

Kingfisher Villa's Auction Failure | किंगफिशर व्हिलाचा लिलाव अपयशी

किंगफिशर व्हिलाचा लिलाव अपयशी

Next

मुंबई : बँकांचे कोट्यवधींचे कर्ज विदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांचा गोव्यातील बंगला ‘किंगफिशर विला’ विकून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला.
किंमत ५ टक्क्यांनी कमी करून ८१ कोटी करण्यात आल्यानंतरही लिलावात त्याला गिऱ्हाईक मिळू शकले नाही. १७ बँकांच्या कंसॉर्टिअमने हा लिलाव आयोजित केला आहे. या बँकांचे मल्ल्या यांच्याकडे ९ हजार कोटी रुपये थकले आहेत. याच आठवड्यात मल्ल्या यांचे मुंबईतील घर विकण्याचा प्रयत्न बँकांनी केला होता. तोही फसला होता. रिअल इस्टेट क्षेत्रातील किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे या मालमत्तेला ग्राहक मिळत नसेल, असा अंदाज या क्षेत्रातील माहितगारांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Kingfisher Villa's Auction Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.