मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:41 PM2024-06-06T14:41:34+5:302024-06-06T14:44:29+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा आधी ९ जूनला होणार होता, पण मोदींच्या शपथविधीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

Kingmaker in Modi government but King in Andhra Pradesh as Chandrababu Naidu will take oath as Chief Minister on June 12 | मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

मोदी सरकारमध्ये 'किंगमेकर', आंध्रमध्ये 'किंग'! चंद्राबाबू १२ जूनला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Chandrababu Naidu, Andhra Pradesh Assembly Election 2024: तेलुगू देसम पक्षाचे (Telugu Desam Party) प्रमुख चंद्राबाबू नायडू हे १२ जून रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीची तारीख नुकतीच बदलण्यात आली आहे. आधी हा कार्यक्रम ९ जून रोजी होणार होता, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. नायडू यांच्या शपथविधीच्या तारखेत बदल होण्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची उपस्थिती असे सांगितले जात आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन नेते सध्या देशाच्या राजकारणातील किंगमेकर आहेत. त्यामुळे देशाच्या शपथविधीसाठी राज्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. मोदींनी बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केले होते. राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना कार्यवाहक पंतप्रधान राहण्याची विनंती केली. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यात यश आलेले नाही. चंद्राबाबू नायडू एनडीए आघाडीसाठी किंगमेकर आहेत. एनडीएने सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवण्याचा विक्रम केला आहे. युतीचे सरकार स्थापन करण्यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे महत्त्वाचे योगदान असणार आहे.

आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंचा दमदार विजय

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात तेलगु देसम (TDP) ने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. टीडीपीने १३५ जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. तर जनसेनेला २१ जागा मिळाल्या. आठ जागा जिंकण्यात भाजपला यश आले. पण सत्ताधारी पक्ष असलेल्या YSR काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागाच मिळवल्या. तसेच, लोकसभेच्या बहुतांश जागाही एनडीएकडे गेल्या.

तेलुगू देसम पक्ष १९९६ नंतर पहिल्यांदा एनडीएमध्ये सहभागी

१९९६मध्ये तेलगु देसम पक्ष पहिल्यांदा एनडीएचा भाग बनला होता. चंद्राबाबू नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले होते. एवढेच नाही तर तेलगु देसम पक्षाने आंध्रमध्ये २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही भाजपसोबत लढल्या होत्या, पण २०१९ मध्ये टीडीपी एनडीए पासून वेगळी झाली होती.

Web Title: Kingmaker in Modi government but King in Andhra Pradesh as Chandrababu Naidu will take oath as Chief Minister on June 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.