पतीकडून किरण बेदींचा बचाव कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या

By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:08+5:302015-02-11T00:33:08+5:30

चंदीगड : भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर त्यांचे पती ब्रिज बेदी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहे़ भाजपा कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या, असे ७१ वर्षीय ब्रिज बेदी यांनी म्हटले आहे़

Kiran Bedi lost Kiran Bedi because she did not get full support from the rescue workers | पतीकडून किरण बेदींचा बचाव कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या

पतीकडून किरण बेदींचा बचाव कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या

Next
दीगड : भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर त्यांचे पती ब्रिज बेदी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहे़ भाजपा कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा न मिळाल्यामुळेच किरण बेदी हरल्या, असे ७१ वर्षीय ब्रिज बेदी यांनी म्हटले आहे़
बेदींना कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा असता तर त्यांना कुणीही हरवू शकले नसते़ किरण कृष्णानगर येथून २००० मतांच्या फरकाने निवडणूक हरल्या़ आतापर्यंत भाजपा नेते हर्षवर्धन या ठिकाणावरून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत़ भाजपा कार्यकर्त्यांनी बेदींसाठी काम केले नाही, हे यावरून स्पष्ट होते़ बेदींना जनतेसमोर सादर करण्यात कार्यकर्तेच चुकले, असे ब्रिज बेदी यांनी म्हटले आहे़ दिल्लीची तरुणाई यावेळी आम आदमी पार्टीच्या बाजूने होती़ आम आदमी पार्टीच्या विजयात दिल्लीच्या तरुणाईचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले़
ब्रिज बेदी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत़ अमृतसर येथे गरीब मुलांना नि:शुल्क शिक्षण देणारी शाळा ते चालवतात़

Web Title: Kiran Bedi lost Kiran Bedi because she did not get full support from the rescue workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.