किरण बेदींची १२ तासांत माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:13 AM2018-04-30T02:13:48+5:302018-04-30T02:13:48+5:30

पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी ‘स्वच्छतागृह नाही, तर तांदूळ नाही’ हा वादात सापडलेला व शनिवारी सकाळी दिलेला आदेश १२ तासांत मागे घेतला.

Kiran Bedi retires in 12 hours | किरण बेदींची १२ तासांत माघार

किरण बेदींची १२ तासांत माघार

Next

नवी दिल्ली : पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी ‘स्वच्छतागृह नाही, तर तांदूळ नाही’ हा वादात सापडलेला व शनिवारी सकाळी दिलेला आदेश १२ तासांत मागे घेतला.केंद्रशासित प्रदेशातील अत्यंत गरीब कुटुंबांना मोफत तांदूळ दिला जातो. या लाभार्थींनी त्यांचे
गाव उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त (ओपन डिफेकेशन फ्री-ओडीएफ) झाल्याचे व स्वच्छ झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना मोफत तांदूळ मिळणार नाही, असे आदेशात
म्हटले होते. हा आदेश म्हणजे ‘हुकुमशाही’ असल्याची जोरदार
टीका काँग्रेसने केल्यानंतर तो मागे घेतला गेला. किरण बेदी यांनी प्रशासनाला सांगितले होते, की ग्रामीण भागातील नेते मंडळी सरकारकडून चांगल्या सोयी- सवलती तावातावाने मागतात व त्यासाठी प्रयत्नही करतात. परंतु, स्वच्छ भारत योजनेतील आरोग्य मोहिमांसाठी तेवढाच उत्साह दाखवत नाहीत. शनिवारी सकाळी बेदी यांनी खेड्याला भेट दिल्यावर आदेश निघाला होता. खेडे खूपच अस्वच्छ असल्याचे त्यांचे मत बनले व त्यांनी आदेश जारी करण्यास सांगितले.

Web Title: Kiran Bedi retires in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.