'तुमच्या बॉसना सांगा...'; किरेन रिजिजूंच्या मुलीनं बाबांना असं नेलं शाळेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:07 PM2018-10-01T15:07:03+5:302018-10-01T15:07:54+5:30
किरेन रिजिजू यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद असल्यामुळे त्यांच्या कामाचे शेड्यूल बिझी असते. मात्र, या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत किरेन रिजिजू यांनी आपल्या मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांच्याकडे केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद असल्यामुळे त्यांच्या कामाचे शेड्यूल बिझी असते. मात्र, या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत किरेन रिजिजू यांनी आपल्या मुलीच्या शाळेतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुलीसोबत काहीवेळ घालवला आणि फोटो सुद्धा काढले. यासंदर्भातील व्हिडीओ किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर पोस्ट केला असून त्यांनी आपल्या मुलीचा एक किस्सा पण सांगितला आहे.
किरेन रिजिजू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची मुलगी खुप सुंदर दिसत आहे. ती आपल्या वडिलांनी शाळेत येण्याची विणवणी करताना दिसते. ती म्हणते, मुलीच्या शाळेत जायचे आहे, असे कारण बॉसला सांगून तुम्ही सुट्टी घ्या, ते तुम्हाला माफ करतील. उद्या, ग्रँडपेरेंट्स डे आहे. तुम्हाला उद्या शाळेत यायचे आहे. मम्मी सतत शाळेत येते आणि माझे परफॉर्मेंस पाहते. तिने माझा डान्स सुद्धा पाहिला आहे...फिश डान्स ! मात्र, तुम्ही माझ्या शाळेत कधी आलाच नाही. असे कसे होईल पापा? माझे ग्रँडपेरेंट्स लांब गावाहून दिल्लीत येत आहेत.
This is how my little daughter convinced me to attend her school's "Grandparents Day" for the first time. pic.twitter.com/ZaIt3y658D
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 30, 2018
याला उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणतात, 'ऑलराइट, मी येण्याचा प्रयत्न करेन. मी, या दिवसात जास्त व्यस्त आहे. काय करता येईल?' यावर त्यांची मुलगी म्हणते, बॉस यासाठी नकार देणार नाही. दरम्यान, किरेन रिजिजू यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओला जवळपास 800 लोकांनी रिट्विट केले आहे आणि 5,000 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.