स्वयंपाकघर म्यानमारमध्ये, हॉल भारतात!, दोन देशांत विभागलेलं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:43 AM2018-03-16T01:43:19+5:302018-03-16T01:43:19+5:30
एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा वगैरे प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण असं एक गाव आहे, जेथील लोक एका देशातून दुसºया देशात पासपोर्ट वा व्हिसा नसतानाही जातात.
एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा वगैरे प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण असं एक गाव आहे, जेथील लोक एका देशातून दुसºया देशात पासपोर्ट वा व्हिसा नसतानाही जातात. अगदी रोज फिरत असतात. गंमत म्हणजे ते एका देशातून दुसºया देशात गेले तरी ते असतात मात्र आपल्याच गावात. या गावाचं नाव आहे लुंगवा.हे गाव आहे भारत आणि म्यानमारच्या सीमेवर. नागालँड राज्यातील हे गाव अर्धं म्यानमारमधील सागाइंग प्रांतात आहे. तेथील अनेक घरंही दोन देशांत विभागली गेली आहे. म्हणजे स्वयंपाक घर म्यानमारमध्ये आणि हॉल किंवा अंगण भारतात. इतकंच काय, घराच्या एका भागावर भारत आणि दुसºया भागावर म्यानमार असं लिहिलेलं असतं. शेतीच्या बाबतीतही असंच आहे. गावकºयांकडे दोन्ही देशांची नागरिकत्वाची ओळखपत्रं आहेत. या गावाचा प्रमुख म्यानमारच्या सैन्यात आहे.दोन्ही देशांची आंतरराष्ट्रीय सीमारेषा गावाच्या मधून जाते. भारत-म्यानमार सीमेवरील गावात आपलं स्वागत आहे, असा बोर्ड तिथं लावलेला आहे. येथील सर्व लोक एकाच जमातीचे आहेत. त्यांच्या दृष्टीने गाव, देश, सीमा यापेक्षा जमात अधिक महत्त्वाची आहे. तिथं वाद, भांडणं होतात. परंतु, त्याचा संबंध देशाशी येतच नाही.