गुडघा शस्त्रक्रिया झाली स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:13 AM2017-08-17T05:13:50+5:302017-08-17T05:13:53+5:30
केंद्र सरकारने गुडघा प्रत्यारोपणाची किंमत ५४ हजार ते १ लाख १४ हजार रुपयांदरम्यान निर्धारित करून गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुडघा प्रत्यारोपणाची किंमत ५४ हजार ते १ लाख १४ हजार रुपयांदरम्यान निर्धारित करून गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या लागणाºया खर्चाच्या तुलनेत आता गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जवळपास ७० टक्के स्वस्त होणार आहे. गुडघा प्रत्यारोपणाची कमाल किंमत निर्धारित करण्यात आल्याने अशा रुग्णांची वर्षाकाठी १,५०० कोटी रुपयांची बचत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी भाषणात कार्डियाक स्टेंटप्रमाणे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया स्वस्त करण्याचा मुद्दा मांडला होता. एमआरपीपेक्षा अधिक किंमत आकारल्यास अशा इस्पितळ, विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल़