...यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडली होती टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 5 वाजताची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 06:07 PM2020-03-22T18:07:02+5:302020-03-22T18:26:02+5:30
ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते.
मुंबई - जनता कर्फ्यूदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी 22 मार्चचा सायंकाळी पाज वाजताचा मुहूर्त निवडला होता. मोदींनी हाच मुहूर्त का निवडला? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर चला जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींनी हीच वेळ का निडवडली असावी.
ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते. आज 22 तारीख आहे. याचा अर्थ 2+2 = 4, 4 हा राहुचा अंक आहे. तसेच 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे.
ज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता. या काळात वातावरणातील विषाणू हटविण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो. याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधले. यापार्श्वभूमीवरच कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली असावी.
ज्योतिषशास्त्र मानायचे की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणे, अधिक माणसांच्या संपर्कात न येणे, हेच कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, हे सर्व नेत्यांचे आणि यंत्रणांचे आवाहन प्रत्येकाने ऐकणे, आवश्यक आहे.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.