पाकिस्तानच्या मनात भारताची धडकी, सर्जिकल अन् एअर स्ट्राईकनंतर वाटते 'या' हल्ल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:33 PM2020-05-11T20:33:02+5:302020-05-11T20:43:42+5:30

पाकिस्तानला भीती वाटत आहे, की भारत कश्‍मिरातील दहशतवाद्यांची कंबर तोडण्याबरोबरच, पाकिस्‍तानातील त्यांचे प्रमुख आणि त्यांची दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यासाठी एखादे ऑपरेशन करू शकतो. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्‍तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्‍ट्राइक केले होते. तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्‍ट्राइक करून अनेक दहशतवादी ठिकानं नष्ट केले होते. 

know about the false flag operation or covert operation  | पाकिस्तानच्या मनात भारताची धडकी, सर्जिकल अन् एअर स्ट्राईकनंतर वाटते 'या' हल्ल्याची भीती

पाकिस्तानच्या मनात भारताची धडकी, सर्जिकल अन् एअर स्ट्राईकनंतर वाटते 'या' हल्ल्याची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देहिजबुल प्रमुख सय्यद सलाहुद्दीनने उत्तर काश्मिरातील जंगलात भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहेअमेरिकेत या प्रकारचे ऑपरेशन नॅशनल सिक्‍युरिटी अॅक्‍ट 1947 अंतर्गत आणण्यात आलेब्लॅक ऑपरेशनदेखील याच प्रकारचे ऑपरेशन होते

नवी दिल्‍ली :भारतीय जवानांनी काश्‍मिरात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी रियाज नायकूचा खात्मा केला. यानंतर पाकिस्तानसह तेथील दहशतवादी संघटनांना धडकी भरली आहे. नायकूच्या खात्म्यानंतर हिजबुल प्रमुख सय्यद सलाहुद्दीनने रावळपिंडीत शोक सभाही घेतली होती. यात त्याने उत्तर काश्मिरातील रजवार जंगलात भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. यामुळे आता भारत आपल्याविरोधात 'फॉल्‍स फ्लॅग ऑपरेशन' करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला सतावू लागली आहे.

पाकिस्तानला भीती वाटत आहे, की भारत कश्‍मिरातील दहशतवाद्यांची कंबर तोडण्याबरोबरच, पाकिस्‍तानातील त्यांचे प्रमुख आणि त्यांची दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यासाठी एखादे ऑपरेशन करू शकतो. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्‍तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्‍ट्राइक केले होते. तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्‍ट्राइक करून अनेक दहशतवादी ठिकानं नष्ट केले होते. 

आणखी वाचा - CoronaVirus News : "आणखी 2 वर्षे हाहाकार माजवणार कोरोना, 'या'मुळे होऊ शकणार नही खात्मा"

असे असते फॉल्‍स फ्लॅग ऑपरेशन - 
फॉल्‍स फ्लॅग ऑपरेशनच्या वेळी, त्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पूर्णपणे लपवली जाते. एवढेच नाही, तर या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्यांपैकी कुणी पकडले गेले, तरी या ऑपरेशनशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले जाते. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्यांना, याची पूर्णपणे कल्पना असते, की आपण पकडले गेलोच, तर सरकार कुठल्याही परिस्थितीत आपला स्वीकार करणार नाही. या प्रकारच्या ऑपरेशनला कव्हर्ट ऑपरेशन, असेही संबोधले जाते.

अमेरिकेत या प्रकारचे ऑपरेशन नॅशनल सिक्‍युरिटी अॅक्‍ट 1947 अंतर्गत आणण्यात आले. 1984मध्ये तत्‍कालीन राष्‍ट्रपती रोनाल्‍ड रिगन यांनी या प्रकारच्या ऑपरेशनला स्पेशल अॅक्टिविटी म्हणत एका आदेशावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकेत सीआयए राष्‍ट्रपतींच्या आदेशानंतर अशा प्रकारचे ऑपरेशन पार पाडते. तर अंडरकव्हर ऑपरेशन लॉ इंफोर्समेन्ट एजंन्सिज पार पाडतात.

आणखी वाचा - CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

कव्हर्ट आणि क्‍लेंडस्‍टाइन ऑपरेशनमध्ये फार छोटा फरक आहे. क्‍लेंडस्‍टाइन याचा अर्थ लपवणे अथवा हिडन असा होतो. तर कव्हर्टचा अर्थ डिनायएबल अथवा अस्वीकार करणे, असा होतो. इतिहासात, अशा अनेक कारवाया झाल्या आहेत. यापैकीच एक ब्लॅक ऑपरेशनदेखील होते.

Web Title: know about the false flag operation or covert operation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.