पंतप्रधान मोदी एकही अक्षर न वाचता तासंतास कसं भाषण करतात; कधी विचार केलाय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 01:05 PM2021-12-14T13:05:54+5:302021-12-14T13:08:12+5:30
या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात.
नवी दिल्ली - जेव्हा राजकारणी लोक व्यास पीठावरून बोलत असतात, तेव्हा त्यांना जनतेशीही आय कॉन्टॅक्ट ठेवा लागतो. अशा स्थितीत, भाषण लिहिलेले असेल तर त्यांना जनतेशी आय कॉन्टॅक्टमध्ये अडचण येऊ शकते. मात्र, यावर मात करण्यासाठी एक असे उपकरण बाजारात उपलब्ध आहे, जे टीव्ही न्यूज अँकरही वापरतात. जर या उपकरणासंदर्भात आपल्याला माहिती नसेल तर जाणून घ्या...
काय आहे हे उपकरण? -
आम्ही ज्या डिव्हाइससंदर्भात बोलत आहोत, त्याला टेलीप्रॉम्प्टर असे म्हणतात. या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात.
असे करते काम -
टेली प्रॉम्प्टर्सचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते. या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, त्यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो.
किती असते किंमत -
टेली प्रॉम्प्टरची किंमत लाखो रुपयांत आहे. कारण ते हाय-टेक तंत्रज्ञानावर काम करतात. ते मिटिंग्स सभा आणि रॅलींमध्ये वापरले जाते. देश-परदेशात यांना मोठी मागणी आहे. टेली प्रॉम्प्टर कमी बजेट मध्येही मिळते. पण ते तेवढे हायटेक नसतात. तसेच, वापरण्यातही अडथळा येतो. पत्रकारितेच्या संस्थांमध्येही अँकर्स याचा वापर करून बातम्या वाचतात आणि तुम्हाला कळतही नाही.