Afghanistan Taliban Crisis: काबुलची परिस्थिती पाहता भारतानं आणला e-Emergency X-Misc व्हिसा; जाणून घ्या याबद्दल सर्वकाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:08 PM2021-08-17T17:08:14+5:302021-08-17T17:09:50+5:30
गृह मंत्रालय जे व्हिसा निगडीत एक नोडल मिनिस्ट्री म्हणून काम करते. त्यांच्याकडून मंगळवारी या नव्या व्हिसाची घोषणा करण्यात आली
नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्याठिकाणची परिस्थिती पाहता भारताने स्वत:च्या व्हिसा पॉलिसीत बदल केला आहे. आता इलेक्ट्रोनिक व्हिसाऐवजी नवीन पर्याय देण्यात आला आहे. या व्हिसाला ई-इमरजेन्सी X-Misc व्हिसा म्हटलं गेले आहे. त्यामुळे भारतात येण्यासाठी व्हिसा अर्जदारांना फास्ट ट्रॅक केले जाईल. यावेळी हजारोपेक्षा अधिक भारतीय अफगाणिस्तानात फसले आहेत. भारतीय वायूसेना एअरक्राफ्टच्या माध्यमातून अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात आणत आहेत.
काय आहे या व्हिसाचा उद्देश?
गृह मंत्रालय जे व्हिसा निगडीत एक नोडल मिनिस्ट्री म्हणून काम करते. त्यांच्याकडून मंगळवारी या नव्या व्हिसाची घोषणा करण्यात आली. गृह मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आले आहे की, इलेक्ट्रॉनिक व्हिसामध्ये नवीन पर्याय देण्यात आला आहे. सूत्रांनुसार, भारताने व्हिसा कॅटेगिरी नव्याने सुरु केली आहे. कारण व्हिसा प्रक्रिया सहज आणि जलदगतीने होईल. त्यामुळे अडचणीत असलेल्या गरजवंतांसाठी तातडीने सुविधा दिली जाऊ शकते. काबुल स्थित भारतीय दूतावास वेबसाइटनुसार भारतात दाखल होण्यासाठी दोन प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता असते.
X Visa: म्हणजे एन्ट्री व्हिसा जो भारतीय मूळ असलेल्या कुठल्याही व्यक्तीला जारी केला जातो. हा व्हिसा भारतीय मूळ व्यक्तीशिवाय त्यांच्या बायकोला, मुलांना आणि त्यांच्यावर निर्भर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना जारी केला जातो. हा व्हिसा त्या कारणासाठी दिला जातो जो कुठल्याही दुसऱ्या व्हिसा कॅटेगिरीत मोडत नाहीत.
X-Misc Visa: म्हणजे एन्ट्री व्हिसा भारतात येणाऱ्या कुठल्याही बाहेरील व्यक्तींसाठी दिला जातो. दिल्ली येथील दुसऱ्या दूतावास कार्यालयात व्हिसा मुलाखतीमार्फत अन्य व्यक्तीला भारतात येण्यासाठी परवानगी दिली जाते. हा व्हिसा प्रत्येक देशातील नागरिकांला दिला जातो. सध्या भारताने फक्त अफगाणिस्तानवरुन येणाऱ्या नागरिकांना ईमरजेन्सी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुविधा दिली आहे. याचा अर्थ जर अफगाणिस्तानातून कोणत्याही व्यक्तीला भारतात येऊन दुसऱ्या देशात जायचं असेल तर तो E Emergency X Misc व्हिसा घेऊन भारतात येऊ शकतो आणि दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देऊ शकतो.
कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?
- त्या पासपोर्टची फोटो कॉपी ज्यात भारतात येण्यासाठी प्रस्तावित तारीख कमीत कमी ६ महिने वैध ठरेल
- अफगाणिस्तानच्या नॅशनल स्टैटिस्टिक्स अँन्ड इनफॉर्मेशन अथॉरिटीकडून जारी करण्यात आलेली कागपत्रे, अफगाणी असल्याचं ओळखपत्र
- पोलिओ लसीकरण प्रमाणपत्र
- ज्या दुसऱ्या देशातील दूतावासात मुलाखत घेण्यासाठी जायचं आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळालेले पत्र, ज्यात मुलाखतीच्या तारखेचा उल्लेख असेल
- तसेच त्या काळाचा उल्लेख हवा ज्यात व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दूतावासाकडून लागणारा वेळ
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला हेल्पलाईन नंबर
रविवारी १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. काबुल स्थित संसद आणि राष्ट्रपती भवन तालिबानने हाती घेतलं. त्यानंतर काबुलमधील भारतीय दूतावास आणि इतर स्टाफला पुन्हा भारतात आणलं गेले. त्यानंतर आता एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ९१९७१७७८५३७९ या नंबरवर कॉल करून मदत मागू शकतात. त्यासोबत MEAHelpdeskIndia@gmail.com या ईमेलशी संपर्क साधता येईल.