केवळ 10 रुपयांत उघडा पोस्टात खाते अन् बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 04:47 PM2018-09-18T16:47:35+5:302018-09-18T16:59:04+5:30
पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल.
नवी दिल्ली - कमी पैशात जास्तीत जास्त नफा कसा मिळेल किंवा कमी पैशांच्या गुंतवणुकीत आपणास भरगोस परतावा कोठून मिळेल, याचा नेहमीच आपण शोध घेत असतो. त्यामुळेच, खासगी बँकांच्या योजना, फायनान्स कंपनीच्या योजना, एलआयसीच्या योजना आणि पोस्टाच्या योजनांकडे आपले सातत्याने लक्ष असते. आता, पोस्टाने अशीच एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे. त्यानुसार, केवळ 10 रुपयांत पोस्टात खाते उघडले जाऊ शकते.
पोस्ट खात्यात 5 वर्षीय पोस्ट ऑफिस डिपॉजीट अकाऊंट (आरडी) काढून आपणास हे खाते उघडण्यात येईल. आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात हे खाते खोलता येईल. केवळ 10 रुपये भरुन हे खाते उघडण्यात येऊ शकते. या खात्यावर ग्राहकांना 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. जे व्याज बँकांमधून मिळणाऱ्या बचत खात्यापेक्षा अधिक आहे. सध्या, बँकांमधील बचत खात्यांवर 3.5 ते 6 टक्के (सर्वाधिक) व्याज मिळते. दरम्यान, या खात्यासाठी तुम्ही ज्वॉईंट पद्धतीनेही खाते खोलू शकता.
पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल.
* यासाठी आरडी करणे फायदेशीर
यामध्ये तुम्ही तुमच्या बचतीनुसार दरमहिन्याला बचत करु शकता.
एका विशिष्ठ लक्ष्यानुसार तुम्ही रक्कम बचत करु शकता.
यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळणारे व्याजदर निश्चित स्वरुपाचे आहे. ग्राहकांसाठी हा सर्वात मोठा फायदा आहे.
नियमित व्याजसह फिक्स डिपॉजीटसाठीही याचा फायदा होतो. तुम्ही 10 वर्षांपर्यंत ही मुदतवाढ करु शकता.
विशेष म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही बचत खात्यातून 50 टक्के रक्कम काढूही शकता.