जाणून घ्या आजचा दिनविशेष : २७ जानेवारी
By Admin | Published: January 27, 2017 12:24 PM2017-01-27T12:24:32+5:302017-01-27T13:02:46+5:30
आजच्या दिवशी काय काय महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, जाणून घ्या दिनविशेषद्वारे
>नामदेव मोरे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - आजच्या दिवशी काय काय महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, जाणून घ्या दिनविशेषद्वारे :
महत्वपूर्ण घडामोडी
१९७३ : पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
१९६७ : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.
१८८८ : वॉशिंग्टन डी. सी. येथे 'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'ची स्थापना
जन्मदिन / जयंती:
१९६७ : बॉबी देओल – हिंदी चित्रपट कलाकार
१९२६ : जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)
१९२२ : अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिंदी चित्रपटांतील खलनायक (मृत्यू: २२ आक्टोबर १९९८)
१९०१ : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष. १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४)
1951 - शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे.
१८५० : एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२)
पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००९ : आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
२००८ : सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१)
२००७ : कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२)
१९८६ : निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ आक्टोबर १९३१)
१९६८ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२)
१९४७ : पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८)