लक्षात ठेवा, तुमच्या सणाचा कोणालाही त्रास होता कामा नये, भाजपा खासदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 11:06 AM2019-06-05T11:06:33+5:302019-06-05T11:10:43+5:30
उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधले खासदार भोला सिंह यांनी ईदच्या एक दिवसापूर्वीच मुस्लिमांना सल्ला दिला आहे.
बुलंदशहरः उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधले खासदार भोला सिंह यांनी ईदच्या एक दिवसापूर्वीच मुस्लिमांना सल्ला दिला आहे. ईदच्या उत्साह साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हिंदूसुद्धा होळी, दिवाळी आणि रक्षाबंधनसह इतर सण साजरे करतात. पण त्या सणांचा कोणालाही त्रास होत नाही. भोला सिंह यांनी कोणत्याही धर्माच्या सणाला उल्लेख न करता सांगितलं की, तुमच्या सणामुळे इतर लोकांना त्रास झाल्यास कारवाई करण्यात येईल.
तुमच्या श्रद्धेचं प्रदर्शन करण्यासाठी एक खास जागा दिलेली आहे. तुमच्या श्रद्धेच्या नावाखाली रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होता कामा नये. तरीही असं झाल्यास प्रशासन योग्य कारवाई करेल.
BJP MP from Bulandshahr, Bhola Singh: If there is inconvenience due to someone's festival of any religion, it should not be done. A place has been designated for expressing your devotion, roads should not be blocked. If it happens it is wrong, action should be taken. (04.06.2019) https://t.co/m0tKuNPf3F
— ANI UP (@ANINewsUP) June 5, 2019
जेव्हा भोला सिंह यांनी ट्विटरवरून लोकांना रस्त्यावर येऊन वाहतुकीची कोंडी न करण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.
BJP MP from Bulandshahr, Bhola Singh: While celebrating festivals it should be seen that it doesn't cause inconvenience to the others. Hindus celebrate Holi, Diwali, Raksha Bandhan & the entire country celebrates that but no experiences inconvenience due to our festivals. (04.06) pic.twitter.com/luvftBO4k8
— ANI UP (@ANINewsUP) June 5, 2019
एका ट्विटर वापरकर्त्यानं म्हटलं आहे की, चला कोणी तरी हिंमत दाखवली. पूर्ण देशात आठवड्यामध्ये कुठे एक दिवस रस्ता जाम असतो, तर कुठे ट्रेनच्या रुळांवर श्रद्धा दाखवली जाते, असं दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी सांप्रदायिक सद्भावनेचा हवाला दिला आहे. तर काहींनी कोणत्याही धार्मिक सणाला विरोध करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.